मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त स्वामी विवेकानंद विद्यामंदिर शाळेमध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न

केज/प्रतिनिधी
जीवन विकास शिक्षण मंडळ केज संचलित, स्वामी विवेकानंद विद्यामंदिर माध्यमिक विभाग या शाळेमध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिन अत्यंत हर्षोत्साहा मध्ये साजरा करण्यात आला.याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून अंबेजोगाई येथील सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी तथा कर्नल एम. एच. कांबळे हे उपस्थित होते.तर अध्यक्ष म्हणून संस्थेचे सचिव जी.बी.गदळे यांनी उपस्थिती दर्शविली. इतर मान्यवरांमध्ये संस्थेचे अध्यक्ष अंकुशरावजी इंगळे,कमलाकर मंगरूळकर, माजी सैनिक जनार्दन सोनवणे, शालेय व्यवस्थापन समिती स्वयंअर्थ शाळेचे अध्यक्ष नारायण अण्णा अंधारे, सेवानिवृत्त मु.अ. बाळासाहेब तिडके, शाळेच्या मुख्याध्यापिका शिवनंदा मुळे, प्राचार्य शंकर भैरट तसेच शाळेतील शिक्षक वृंद आदी उपस्थित होते.
स्वामी विवेकानंद विद्यामंदिर माध्यमिक विभाग या शाळेमध्ये दि.१७ सप्टेंबर २०२५ वार बुधवार रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यात आला.याप्रसंगी अंबेजोगाई येथील डॉ. कर्नल एम.एच.कांबळे यांच्या हस्ते ठीक ८:०५ ला ध्वजारोहण पार पडले.
याप्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले , आज खरं तर हा क्षण आनंदाचा आहे परंतु दुःखही तितकच आहे,कारण अनेकांनी या क्षणासाठी आत्माहुती दिली, आपल्या जीवनाचा असीम त्याग केला. देशामध्ये जवळपास ५६५ संस्थाने होती. भारत स्वतंत्र झाल्या नंतर बहुतांश संस्थाने स्वतंत्र भारतात विलीन झाली.परंतु याला अपवाद तीन संस्थाने होती.जम्मू काश्मीर, जुनागड व हैदराबाद. तेंव्हा त्याकाळी या संस्थांनाच्या विलीकरणाचा प्रश्न फार जटील बनला होता. स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ तसेच तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभाई पटेल यांचे योगदान अतिशय महत्त्वाचे मानले जाते.
याप्रसंगी त्यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामा तील अनेक प्रसंगांना उजाळा देण्याचा काम केलं.पुढे ते म्हणाले, अशा कार्यक्रमांचं सातत्याने आयोजन झालं पाहिजे कारण ज्यांनी खऱ्या अर्थाने त्याग केला.आजच्या युवा पिढीने त्यांचा आदर्श घेतला पाहिजे. देशा सेवा करण्याची संधी मिळेल अथवा नाही,परंतु प्रत्येकाने शिस्तबद्ध जीवन जगले पाहिजे. इतरांप्रती सहिष्णुता दाखवली पाहिजे . कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रबोधकांत समुद्रे यांनी केले. तर आभार शाळेच्या मुख्याध्यापिका शिवनंदा मुळे यांनी मानले.



