पाडवा स्नेहमेळाव्यात आडस येथे शुभेच्छा देण्यासाठी अलोट गर्दी शेतकरी हितासाठी व अठरापगड जातीच्या एकतेसाठी कार्य करत राहु- रमेशराव आडसकर

केज/प्रतिनिधी
अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानाची दखल घेत शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी व त्यांच्या हितासाठी प्रामाणिकपणे कार्य करत आहोत, असे मत ज्येष्ठ नेते तथा अंबा सहकारी साखर कारखान्याचे चे अरमन रमेशराव आडसकर यांनी व्यक्त केले.पारंपरिक सामाजिक सलोखा जपण्यासाठी व अठरा पगड जातींना एकत्र घेऊन जाण्याचा वारसा पुढे नेण्यासाठी दीपावली पाडवा निमित्त आयोजित स्नेहमेळाव्यात विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
रमेशराव आडसकर म्हणाले की, “जग पुढे जात असताना आपण आपल्या मुळाशी जोडलेले राहिले पाहिजे. स्व.आ.आडसकर तात्यांनी सुरू केलेली अठरापगड जातींच्या ऐक्याची परंपरा आम्ही जपतो आहोत. समाजकारण आणि राजकारणाच्या माध्यमा तून सर्वसामान्य जनतेच्या सेवेत सदैव कार्यरत राहू.”त्यांनी पुढे सांगितले की, “जातीय तणाव दूर ठेवण्यासाठी सर्वयुवकांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे.येणारा काळ हा शेतकरी,कामगार, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेसाठी भरभराटीचा जावो,हीच शुभेच्छा.”
प्रमुख मान्यवरांचे विचार
संजय आबा दौंड (माजी आमदार) –“आडसकर हे नाव जिल्ह्यात विश्वासाचं प्रतीक आहे.रमेशराव आडसकर हे भविष्यात आमदार होतील,याचा विश्वास आहे.जनतेचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे.”
राजेश्वर चव्हाण (जि.अ.रा.कॉ.) –“आडसकर परिवाराने समाजाशी जिव्हाळ्याचं नातं जपलं आहे. रमेशराव आडसकर यांचे राजकीय भविष्य उज्ज्वल आहे.”
दत्ता आबा पाटील (उपाध्यक्ष,अंबा साखर कारखाना) -“आडसकर-पाटील वैर संपले आहे.आता उर्वरित आयुष्य एकत्र काम करत शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न करू.”
राज किशोर पापा मोदी -“स्व.आडसकर तात्यांच्या प्रेरणेतून आम्ही काम करतो आहोत. रमेशराव आणि ऋषी भैय्या तात्यांचा वारसा पुढे नेत आहेत.आम्ही त्यांच्या सोबत आहोत.”
अंकुशराव अण्णा इंगळे (सभापती,कृ.उ.बा. समिती) -“पूर्वीच्या निवडणुकांमध्ये आडसकरांनी इतरांना मदत केली,मात्र येणाऱ्या स्थानिक निवडणुकांमध्ये नागरिकांनी आडसकर कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं.”
डॉ.हारूणभाई इनामदार (नेते,राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार) –“स्व.तात्यांनी पाया घातला आणि रमेशराव आडसकरांनी कळस चढवला.अठरापगड जातींच्या एकतेचा संदेश हा स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने अधोरेखित होतो आहे.”
या प्रसंगी उपस्थित मान्यवर राजाभाऊ औताडे, नगराध्यक्षा डॉ. सौ.सिताताई बनसोड, राहुल भैय्या सोनवणे, हनुमंत मोरे,ईश्वर मुंडे, नगरसेवक राजू इनामदार, धनंजय देशमुख,माधव तात्या निर्मळ,बबन भैय्या लोमटे,किसन कदम,अमर भैय्या पाटील,अजहर इनामदार,कैलास पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.स्नेहमेळावा यशस्वी पणे पार पडल्यानंतर सर्व मान्यवरांनी रमेशराव आडसकर यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.दिवाळी फराळाचा आस्वाद घेऊन कार्यक्रम संपन्न झाला.



