अध्यात्मिक

कै.चंद्रकलाताई गदळे यांच्या वर्षश्राध्द कार्यक्रमानिमित्त रविवारी ह.भ.प.श्री.समाधान शर्मा महाराज यांच्या कीर्तनाचे दहिफळ (वडमाऊली) येथे आयोजन 

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील दहिफळ वडमाऊली येथील सेवानिवृत्त प्राचार्य तथा शालेय संस्थापक अध्यक्ष सखाहारी तात्या गदळे यांच्या पत्नी व भाजपा युवा मोर्चाचे केज तालुकाध्यक्ष राहुल भैय्या गदळे यांच्या मातोश्री कै. सौ.चंद्रकलाताई सखाहारी गदळे यांच्या चतुर्थ वर्षश्राध्द कार्यक्रमा निमित्त दि.१९ ऑक्टोबर रविवार रोजी सकाळी साडेदहा वाजता सुप्रसिद्ध रामायनाचार्य विविध कथा व किर्तनकार भावरत्न ह.भ.प.समाधान शर्मा महाराज यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.

तरी या कार्यक्रमाला आपण उपस्थित रहावे अशी विनंती गदळे परीवाराच्या वतीने करण्यात आली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की,केज तालुक्यातील दहिफळ वडमाऊली येथील येथील सेवानिवृत्त प्राचार्य तथा शालेय संस्थापक अध्यक्ष सखाहारी (तात्या) गदळे यांच्या पत्नी व भाजपा युवा मोर्चाचे केज तालुकाध्यक्ष राहुल भैय्या गदळे यांच्या मातोश्री कै.सौ.चंद्रकलाताई सखाहारी गदळे यांच्या चतुर्थ वर्षश्राध्द कार्यक्रमा निमीत्त दहिफळ (वडमाऊली) ता.केज येथील श्रीक्षेत्र वडमाऊली मंदीराजवळ सखाहारी (तात्या) गदळे यांनी स्थापन केलेल्या शिव प्रतिष्ठाण संस्थान येथे सुप्रसिद्ध रामायनाचार्य व विविध कथा,कीर्तनकार ह.भ.प. समाधान शर्मा महाराज यांच्या सुश्राव्य किर्तनाचा कार्यक्रम रविवार दि.१९ ऑक्टबर रोजी सकाळी १०- ३० वाजता आयोजित केला आहे.

या कार्यक्रमास आपण उपस्थित रहावे अशी विनंती ह.भ.प. सखाहारी (तात्या) गदळे, राहुल भैय्या गदळे, शरद बप्पा गदळे,सरपंच अनिताताई गदळे, डाॅ. शशिकांत दहिफळकर, जयदत्त दहिफळकर व गदळे परिवाराने केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!