
केज/प्रतिनिधी
चिंचोली माळी जिल्हा परिषदेसाठी होणाऱ्या आगामी निवडणुकीची राजकीय सरगर्मी आता दिवसेंदिवस वाढत चालली आहे.या पार्श्वभूमीवर ओबीसी प्रवर्गातील महिला आरक्षण जाहीर झाल्या नंतर सौ.सरोजिनी दादासाहेब ससाने यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा होत आहे.सौ.सरोजनी ससाने या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय व जनसंपर्कात अग्रेसर असल्याने त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.गेल्या काही महिन्यांपासून स्थानिक पातळीवर आणि विविध राजकीय व सामाजिक माध्यमांतून सरोजिनी ससाने यांच्या नावावर जोरदार चर्चेला उधाण आले आहे.चिंचोली माळी जिल्हा परिषदेसाठी होत असलेल्या आरक्षण सोडतीत ओबीसी महिला प्रवर्ग राखीव ठरल्यानंतर त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित होणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
राजकीय व सामाजिक क्षेत्रातील सक्रिय सहभाग
सौ.सरोजिनी ससाने या काही वर्षांपूर्वी केज पंचायत समितीच्या उप सभापतीपदावर कार्यरत होत्या.या काळात त्यांनी महिला सक्षमीकरणा साठी महत्त्वपूर्ण उपक्रम राबवले आहेत.केज तालुक्यातील महिलांचे जीवनमान उंचावण्या साठी त्यांनी घेतलेली पुढाकार व कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. त्यामुळे स्थानिक महिला वर्गात त्यांचा चांगला जनाधार निर्माण झाला आहे.त्याचबरोबर त्यांनी विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबवून सामान्य जनतेचा विश्वास संपादन केला आहे.या कामगिरीमुळे चिंचोली माळी जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांची उमेदवारी मजबूत दावेदार मानली जात आहे.
वरिष्ठ नेत्यांचा पाठिंबा गरजेचा
गेल्या काही महिन्यां पासून त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळुक यांच्या माध्यमातून सामाजिक कामांमध्ये सक्रीय सहभाग घेतला आहे.शासकीय योजनेद्वारे नागरिकांना मदत पोंहोचवणे,महिलाविकास कार्यक्रम, पायाभूत सुविधांची उभारणी आदी कामांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग दिसून आला आहे.
वाढता जनाधार आणि विजयी समीकरणे
स्थानिक राजकीय समीकरणांनुसार सौ. सरोजिनी ससाने यांनी चिंचोली माळी जिल्हा परिषदेच्या आरक्षित जागेसाठी आपली उमेदवारी दाखल केल्यास त्यांना मतदारांचा मोठा पाठिंबा मिळण्याची शक्यता राजकीय तज्ञांनी व्यक्त केली आहे.त्यांची महिला जनाधारातली मजबूत पकड व कार्यकर्त्यांचा पाठिंबा आणि केलेली कामगिरी पाहता,त्यांची उमेदवारी ही निवडणुकीतील महत्त्वाची ठरणार असल्याचे मानले जात आहे.
महिला सक्षमीकरणा साठी केलेली कामगिरी ठरते भक्कम आधार
उपसभापती पदाच्या कार्यकाळात सरोजिनी ससाने यांनी तालुक्यातील महिलांसाठी अनेक कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवल्या. महिला बचतगट,स्वयं रोजगार आणि शिक्षण क्षेत्रात त्यांनी राबवलेले उपक्रम कौतुकास्पद ठरले आहेत.या कामगिरीच्या जोरावरच त्यांना चिंचोली माळी मतदार संघात चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे स्पष्ट दिसून येते.
आगामी निवडणुकीत प्रमुख भूमिका चिंचोली माळी जिल्हा परिषदेची निवडणूक स्थानिक राजकारणासाठी निर्णायक ठरणार आहे. या निवडणुकीत सौ. सरोजिनी ससाने यांची उमेदवारी नक्कीच राजकीय समीकरणांना नवा कलाटणी देऊ शकते.त्यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा होताच निवडणुकीत जोरदार रंगत येणार असल्याचे चित्र आहे.



