केजचा सुपुत्र संकेत लांडगे याचे राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत चमकदार यश

केज/प्रतिनिधी
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ,नाशिक यांच्या वतीने आयोजित क्रीडा महोत्सव २०२५ मधील राज्यस्तरीय आंतर विभागीय ॲथलेटिक्स व खो-खो स्पर्धेत मराठवाड्याच्या वतीने केजचा सुपुत्र संकेत महादेव लांडगे याने चमकदार कामगिरी केली आहे.केजचा सुपुत्र व धनवेश्वरी आयुर्वेदिक कॉलेज,संभाजीनगरचा विद्यार्थी संकेत महादेव लांडगे याने २०० मीटर आणि १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत महाराष्ट्रातून द्वितीय क्रमांक पटकावून रौप्यपदक सिल्वर मेडल मिळवले.ही स्पर्धा राज्या तील विविध विभागांच्या प्रतिनिधींमध्ये अतिशय उत्साहात पार पडली.
त्याचबरोबर राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत त्याच्या संघाने अव्वल कामगिरी करत महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक गोल्ड मेडल पटकाविले.संकेतच्या या दुहेरी यशामुळे केज तालुका आणि संपूर्ण मराठवाड्याचा गौरव झाला आहे.संकेतच्या या यशाबद्दल संस्थेचे प्राचार्य, प्राध्यापक वर्ग,मित्र परिवार तसेच केज येथील ग्रामस्थांनी त्याचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.तसेच पुढील वाटचालीसाठी त्यांच्या वर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला आहे.
या यशामागे संकेतचा सातत्यपूर्ण सराव, शिस्तबद्ध मेहनत आणि क्रीडाप्रेम स्पष्टपणे दिसून येत आहे.त्याच्या या यशा मुळे मराठवाड्यातील इतर विद्यार्थ्यांनाही क्रीडा क्षेत्रात प्रेरणा मिळणार आहे.



