सामाजिक

जेष्ठ व्यापारी रामेश्वरजी जाजू यांचा तिरुपती वारी तील सलग 60 वर्षांच्या परंपरेबद्दल सकल ब्राह्मण संघर्ष समितीच्या वतीने भव्य सत्कार संपन्न 

केज/प्रतिनिधी

केज येथील प्रसिद्ध व्यापारी व समाजसेवक रामेश्वरजी जाजू यांचा तिरुपती बालाजीच्या ब्रह्मोत्सव वारीतील सलग 60 वर्षांच्या निष्ठावान सहभागाबद्दल समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीच्या वतीनेनुकताच भव्य सत्कार करण्यात आला.ही वारी त्यांच्या वडिलांनी सुरू केलेली परंपरा असून,रामेश्वरजी यांनी ती निष्ठेने अखंडपणे पुढे चालवली आहे.

रामेश्वरजी जाजू यांनी आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत तिरुपती बालाजीच्या ब्रह्मोत्सव वारीसाठी दरवर्षी सलग 60 वर्षे नियमित हजेरी लावली आहे.ही परंपरा त्यांचा मुलगा महेश जाजू हे देखील समर्थपणे पुढे चालवत आहेत. विशेष म्हणजे ,सध्या वयाच्या 77 व्या वर्षात असलेले रामेश्वरजी जाजु यांना नुकतेच एक आजारपण भोगावे लागले, मात्र त्यातून सावरताच त्यांची तिरुपती बालाजीवरची श्रद्धा पुन्हा नव्याने जागृत झाली असून ,येणाऱ्या ब्रह्मोत्सवात सहभागी होण्याची त्यांची तीव्र इच्छा आहे.

या सत्कार समारंभात संघर्ष समिती चे संस्थापक धनंजय कुलकर्णी, ब्राह्मण पुरोहित कल्याण समितीचे प्रदेशाध्यक्ष श्रीनिवास केजकर,ब्राह्मण व्यवसाय कल्याण समितीचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष शिवराज मुथळे, तसेच गोविंद जाजू आणि महेश जाजू यांची विशेष उपस्थिती होती.

समाजासाठी प्रेरणास्थान ठरलेल्या रामेश्वरजी जाजू यांच्या या निष्ठेचे व श्रद्धेचे सर्वत्र कौतुक होत असून, त्यांनी निर्माण केलेली ही भक्तीची परंपरा पुढील पिढ्यांसाठीही आदर्श ठरत आहे.त्यांच्या या सेवाभावी आणि श्रद्धेच्या कार्याची दखल घेऊन समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीने दिलेला हा गौरव निश्चितच त्यांच्या आयुष्यातील एक संस्मरणीय क्षण ठरला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!