
केज/प्रतिनिधी
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने केज तालुक्यातील राजेगाव, बोरगाव ,दैठणा येथील पूरग्रस्तांना संपर्कप्रमुख परशुराम जाधव यांच्या हस्ते व मुंबई नगरसेवक बाळा चव्हाण यांचा सहकार्याने किराणा किट वाटप करण्यात आले.
अतिवृष्टीमुळे केज तालुक्यातील अनेक गावात पिकाचे नुकसान तसेच पूर परिस्थितीमुळे घराचे नुकसान झालेले आहे.यामध्ये संसाराची राख रांगोळी झालेली दिसून येत आहे म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने एक सामाजिक बांधिलकी म्हणून बीड जिल्हा बीड जिल्हा संपर्कप्रमुख परशुराम जाधव यांच्या हस्ते पूरग्रस्तांना २०० किराणा किट चे वाटप मौजे बोरगाव,दैठणा, राजेगाव या ठिकाणी वाटप करण्यात आले यावेळी जिल्हाप्रमुख रत्नाकर आप्पा शिंदे, जिल्हा संघटक नितीन धांडे,तालुकाप्रमुख अशोक जाधव,शहर प्रमुख तात्या रोडे सह प्रभाकर शिंदे, समीर जाधव,धर्मेश सकपाळ आदि शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.



