सुनीलजी हिरवे यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आ. गटात असंख्य कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश

केज/प्रतिनिधी
केंद्रीय मंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना.रामदासजी आठवले यांचे अत्यंत विश्वासू संदिपान तात्या हजारे यांच्या नेतृत्वामुळे आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची ताकद जिल्ह्यात अधिकच वाढते आहे.केज तालुक्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे केज तालुकाध्यक्ष सुनीलजी हिरवे यांच्या नेतृत्वाखाली असंख्य कार्यकर्त्यांनी पक्षांमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.
याविषयी सविस्तर माहिती अशी की,केज तालुक्यामध्ये आगामी काळातील निवडणुकांचा विचार करता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते तथा केजचे तालुकाध्यक्ष सुनीलजी हिरवे यांच्या भक्कम व उत्कृष्ट नेतृत्वा खाली दि.०७/ १० /२०२५ रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया संपर्क कार्यालय केज येथे असंख्य तरुण कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला.
सुनीलजी हिरवे यांची बहुजन समाजाविषयी, समाजा तील तळागाळातील व्यक्तींविषयी, त्यांच्या प्रश्ना विषयीची आस्था, मागास-अतीमागास ,वंचित व अल्पसंख्यांक घटकांसाठी, अन्यायग्रस्तां साठीची तळमळ लक्षात घेऊन त्यांच्यासोबत काम करण्याची जिद्द व आकर्षण तरुणाईला असल्याचे यामुळे स्पष्ट झाले आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट बीड जिल्हा कार्याध्यक्ष संदीप तात्या हजारे यांच्या नेतृत्वाखाली व राष्ट्रीय नेते रामदास आठवले यांच्या मार्गदर्शना खाली तालुकाध्यक्ष सुनील हिरवे मराठा आघाडीचे जिल्हाध्यक्ष नवनाथजी तपसे,अंगद शिनगारे, अमोल मस्के यावेळी उपस्थित होते.रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मध्ये सुरज हजारे ,आनंद शिनगारे,सुमित मस्के, निलेश मस्के,मंगेशसरवदे, अजय मस्के ,संतोष गायकवाड ,नितीन मस्के, प्रेम हजारे इत्यादी तरुण कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला आहे.



