सांस्कृतीक
केज शहरातील पवनराजे इंग्लिश स्कूल मध्ये गरबा महोत्सव उत्साहात संपन्न, चिमुकल्यांचा उत्स्फूर्त सहभाग

केज/प्रतिनिधी
केज शहरातील पवनराजे इंग्लिश स्कूल केज येथे नवरात्र उत्सवा निमित्त गरबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात शाळेतील चिमुकल्यांनी रंगीबेरंगी पोशाख परिधान करून उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. नृत्याच्या तालावर गोल फिरताना विद्यार्थ्यांनी आनंदाचा वर्षाव केला.
या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या गरब्याला पालकांनीही दाद दिली. विविध वयोगटातील मुलांनी सादर केलेल्या गरब्यामुळे शाळा प्रांगणात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.कार्यक्रमाचे नियोजन शाळेच्या शिक्षकांनी केले होते. पारंपरिक सणांचे महत्त्व मुलांना समजावे आणि सांस्कृतिक परंपरा जपण्याची प्रेरणा मिळावी हा या उपक्रमामागील हेतू असल्याचे आयोजकांनी सांगितले.



