आदर्श विद्यालय बनसारोळा शाळेचे बारावी निकालात यश ; गुणवंत विद्यार्थ्यांची उज्ज्वल कामगिरी

केज/प्रतिनिधी
बनसारोळा ता.केज,जि. बीड येथील आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने इ.१२ वी २०२६ च्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत एकूण ९६.१७% शाळेचा निकाल नोंदवला आहे. विद्यालयाच्या या यशा मुळे परिसरात आनंदाचे वातावरण आहे.विज्ञान शाखेचा ९९.६८% निकाल लागला असून प्रथम क्रमांक – उदय गोविंद वाघमारे ८६.८३, द्वितीय क्रमांक –श्रेय आंगणराव बोंडे व कांचन कल्याण काळे ८३.००%, तृतीय क्रमांक – इंद्राणी निलेश कदम ८२.८३ % यांनी मिळवला.
वाणिज्य शाखेत ९८.२७%निकाल लागला असून प्रथम क्रमांक – वैष्णवी नामदेव गीते ७६.५०%,द्वितीय क्रमांक-अजित बालासाहेब राठोड ७२.०० %,तृतीय क्रमांक – शुभम राजेंद्र पोते ७१.३३% यांनी मिळवला .कला शाखेचा ८२.२२% निकाल लागला असून प्रथम क्रमांक- सोनाली दशरथ शिंदे ८०.८३%, द्वितीय क्रमांक -जागृती गणेश कुलकर्णी ७०.५० %,तृतीय क्रमांक -राहुल सुनील देशमुख ६८.६७% यांनी मिळवला.
या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे विद्यालयाच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले.या यशा बद्दल संस्थेचे अध्यक्ष अशोकराव काकडे, मुख्याध्यापक बालासाहेब काकडे तसेच शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विद्यालयाच्या सातत्यपूर्ण गुणवत्तेमुळे उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राहिल्याचे सांगण्यात आले.


