प्रशासकीय

केज येथे वसंत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतसंस्थेची सर्व साधारण सभा संपन्न 

केज/प्रतिनिधी

केज शहरातील वसंत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पत संस्थेची 28 वी वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक 27 नोव्हेंबर 2025 रोजी संपन्न झाली.याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री. रमेशराव आडसकर साहेब,रणजीत भैया आडसकर,प्राचार्य श्री. फावडे सर,चेअरमन श्री.सुरेश शिनगारे सर सचिव श्री.बालासाहेब घुगे सर व सर्व संचालक मंडळ हे होते.यावेळी सर्वप्रथम संस्थेच्या दिवंगत सभासदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.नंतर सरस्वतीचे पूजन करून संस्थेचे प्रेरणास्थान लोकनेते स्व.बाबुरावजी आडसकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

पूर्ण राज्यामध्ये पावसाने शेतकऱ्यांच्या जीवनात भयाण परिस्थिती निर्माण केली असल्याने कसलाही स्वागत सत्काराचा कार्यक्रम रमेशरावजी आडसकर साहेब यांच्या सूचनेनुसार घेण्यात आला नाही.याप्रसंगी बोलताना श्री.रमेशराव आडसकर साहेब यांनी सांगितले की, निसर्ग शेतकऱ्यावर कोपला आहे.जगाचा पोशिंदा संकटात आहे,आपणा सर्वांचे कर्तव्य आहे की प्रत्येकाने आपल्यापरीने मदत करावी.वसंत पत संस्थेच्या वतीनेही भरीव व मोठी मदत करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

याप्रसंगी एमबीबीएस व आयआयटी मध्ये निवड झालेल्या सभासद पाल्यांचा तसेच चालू काळामध्ये सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा ही सन्मान याप्रसंगी त्यांनी केला. तसेच अल्पावधीमध्ये वसंत पतसंस्थेने मिळवलेल्या यशाबद्दल त्यांनीकौतुक केले व सभासदांनी जास्तीत जास्त ठेवी आपल्या पतसंस्थेत ठेवाव्यात अशाही सूचना केल्या.

याप्रसंगी पतसंस्थेचे चेअरमन श्री.शिनगारे सुरेश यांनी पतसंस्थेच्या चालू वर्षाचा ताळेबंद सभासद व उपस्थिता समोर ठेवला हे सांगताना अत्यंत चिकाटीने कारभार करत 91लाख रुपयाचा नफा चालू वर्षात पत संस्थेने मिळाल्याचे त्यांनी सांगितले.तसेच सर्व सभासदांना 13 टक्के दराने लाभांश देण्याचे टाळ्याच्या गजरात घोषित केले.

याप्रसंगी मा.चेअरमन श्री.शाहूराव साखरे सर यांनीही आपले विचार मांडले.वसंत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा अत्यंत खेळी मेळीच्या वातावरणात पार पडली.याप्रसंगी सर्व शाखेचे प्राचार्य, मुख्याध्यापक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. कार्यक्रमाचा समारोप पतसंस्थेचे सचिव श्री.बालासाहेब घुगे सर यांनी केला व कार्यक्रम संपन्न झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!