सामाजिकसांस्कृतीक

नांदूरघाट येथे हिंदू संमेलन उत्साहात संपन्न, हिंदू संस्कृती, एकता व बंधुभावाचा संदेश नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती

केज/प्रतिनिधी

सकल हिंदू समाज, नांदूरघाट यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेले हिंदू संमेलन मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडले.या संमेलनाला गावातील तसेच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह.भ.प. कराळे महाराज होते,तर प्रमुखवक्ते म्हणून महेश दादा आनंदगावकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाची सुरुवात भारत मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने करण्यात आली.

यावेळी बोलताना महेश दादा आनंदगावकर यांनी हिंदू संस्कृती, परंपरा आणि सामाजिक एकतेचे महत्त्व अधोरेखित केले. समाजामध्ये एकजूट आणि बंधुभाव वाढवण्या साठी अशा संमेलनांची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.तसेच युवकांनी समाजकार्यात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.अध्यक्षीय भाषणात ह.भ. प. कराळे महाराज यांनी समाजातील ऐक्य टिकवून ठेवण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे आवश्यक असल्याचे सांगितले.कार्यक्रमाच्या दरम्यान विविध सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये देशभक्तीपर गीत,नृत्य व नाटिका सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल सकल हिंदू समाज, नांदूरघाट यांच्या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!