वाणिज्य

श्रीमंत सरदार महादजी शिंदे शासकीय आय.टी.आय.कॉलेज केज येथे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बी.एस.इ.) मार्फत एक दिवसीय स्मार्ट निवेशक जागरूकता कार्यक्रम संपन्न

केज/प्रतिनिधी

दिनांक 14 ऑक्टोबर 2025 रोजी श्रीमंत सरदार महादजी शिंदे शासकीय आय.टी.आय. कॉलेज केज येथे भारत सरकारच्या भारतीय प्रतिभूती व विनिमय बोर्ड अर्थात (सेबी) तसेच बॉम्बे स्टॉक (बी.एस.इ.) च्या माध्यमातूनआय.टी.आय. च्या विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय स्मार्ट निवेशक जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे आयोजन कॉलेजचे प्राचार्य श्री. विजय बेलेकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून(सेबी) तसेच बी.एस.इ.चे सेक्युरिटीज मार्केट ट्रेनर श्री.गणेश चौधरी सर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना आर्थिक नियोजनाचे मार्गदर्शन केले.यात त्यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीयकृत बँक तसेच पोस्ट ऑफिस मध्ये असलेल्या विविध योजना,डिमॅट अकाउंट, शेअर मार्केट, म्युच्युअल फंड व इतर शासकीय योजनांचे मार्गदर्शन केले.

तसेच गुंतवणूक करत असताना विद्यार्थ्यांनी काय काळजी घ्यावी व फसवणूक करणाऱ्या योजनांपासून सावध राहण्याच्या सूचना दिल्या.हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रा.एस. आर मुसळे सर यांनी विशेष परिश्रम घेत कार्यक्रमाचे आयोजन केले व प्रा.पी.व्ही.वाघमारे सर यांनी सूत्रसंचालन केले.तसेच या कार्यक्रमास प्रा.एस.आर. बंडे सर,व्ही.एस.नोरसे सर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!