साबला येथे मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील मौजे साबला येथील ग्रामपंचायत कार्यालया च्या वतीने सय्यद बाशा पीर साहेब दर्गा या ठिकाणी श्री.विठ्ठलराव नागरगोजे गटविकास अधिकारी, पंचायत समिती,केज यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सरपंच जनाबाई नरहरी काकडे साबला,प्रमुख पाहुणे श्री.अनिलराव चौरे विस्तार अधिकारी, पंचायत समिती केज, श्री.विजयकुमार मस्के विस्तार अधिकारी, पंचायत समिती केज उपसरपंच कचराबाई राजेंद्र सरवदे साबला श्री.तानाजी शिंपले ग्रामपंचायत अधिकारी साबला,श्री.मधुकरराव काकडे माजी सरपंच साबला,मोहजेब इनामदार, मुंबई ,श्री. महादेवराव कटारे माजी सरपंच साबला,श्री. हनुमंतराव नाईकनवरे माजी सरपंच साबला, राहुल सरवदे रिपाई आठवले गट जिल्हा उपाध्यक्ष ,बीड ,वली तांबोळी प्रकल्प समन्वयक एआरटी संस्था,यवतमाळ, श्रीमती ज्योती सांबरे प्रकल्प सहाय्यक एआरटी संस्था यवतमाळ वरील सर्व मान्यवरांच्या हस्ते तसेच साबला येथील नागरिकांच्या उपस्थितीत वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री.विठ्ठलराव नागरगोजे गटविकास अधिकारी,पंचायत समिती केज यांनी मार्गदर्शन करताना आपल्या जीवनात वृक्षांचे महत्व काय आहे.तर सावली गार मिळते,स्वच्छ हवा मिळते वृक्ष लागवड करणे ही सध्याकाळाची गरज आहे तसेच त्यांचे संगोपन ही केले पाहिजे.
मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान या अभियानात आपला सहभाग नोंदवावा. त्याच्या माध्यमातून गावातील स्वच्छतेचे महत्व त्यांनी साबला येथील नागरिकांना समजावून सांगितले. ओला कचरा गोळा करून वेगळा ठेवणे व सुका कचरा गोळा करून वेगळा ठेवणे तसेच प्लास्टिकच्या कॅरी बॅग ईतर कुठेही टाकू नये म्हणजे याच्या पासून डास होणार नाहीत.घाण वास येणार नाही जशी आपण आपल्या आरोग्याची घेतो तशी आपण गावातील नागरिकांच्या आरोग्याची सुध्दा घेतली पाहिजे.
गावातील सांडपाण्यासाठी शोष खड्डा तयार करणे त्या पाण्याचा जमिनीत निचरा करणे,आपल्या घराच्या जवळपास घाण न होऊ देणे अशा प्रकारची कामे करण्या साठी गावातील सर्व नागरिकांनी सहभाग नोंदवावा.गावातआरोग्य केंद्र असावे,गावातील तरुण युवकांना तसेच वयोवृद्ध नागरिकांना व्यायाम करण्साठी मोकळे मैदान असावे. गावातील शाळा, अंगणवाडी यांच्या इमारती मजबूत असायला पाहिजेत असे सांगितले.
या कार्यक्रमासाठी महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.त्यामध्ये नजीर काझी यांनी स्वतःच्या खर्चाने काही वृक्षांची रोपे घेवून दिली आहेत उपस्थित ग्राम पंचायत सदस्य ज्ञानेश्वर पांचाळ,पोपट काकडे, तसेच गणेश कटारे, महादेव काकडे,बालाजी काकडे, दत्तकुमार काकडे ,जालिंदर मुळे, संदिपान काकडे, अभिमान नाईकनवरे, हनुमंत काकडे,अक्षय काकडे,गुलाबराव मुळे, विश्वनाथ नाईकनवरे, लखन राऊत, बाबासाहेब नाईकनवरे, गणेश काकडे,सुदर्शन काकडे,रामहरी काकडे, सिध्देश्वर मुळे,रामेश्वर मुळे,अनिलराव भोसले, महेश काकडे,काशिनाथ काकडे,रंगनाथ काकडे, गोरख काकडे, सौरभ काकडे, राजेश नाईकनवरे ,खैरात काझी, खमरोदिन काझी , लक्ष्मण महाराज काकडे,निहाल काझी, अनंत नाईकनवरे, बाबासाहेब काकडे, संदिपान सरवदे,गणेश सरवदे,संतराम सरवदे तसेच यावेळी गावातील इत्यादी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन लक्ष्मण तात्या काकडे यांनी तर प्रास्ताविक आदर्श शिक्षक नरहरी काकडे यांनी तर आभार प्रदर्शन विजयकुमार शिंदे यांनी केले.



