सुजात आंबेडकर यांच्या भव्य यल्गार महासभेसाठी केज तालुक्यात वंचित बहुजन आघाडीची बैठक संपन्न

केज /प्रतिनिधी
परळी येथे येत्या दि.२९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या भव्य येल्गार महासभेच्या पार्श्वभूमीवर केज येथे वंचित बहुजन आघाडी ची महत्वपूर्ण बैठक पार पडली.या बैठकीत वंचित बहुजनआघाडीचे महासचिव मिलिंद घाडगे यांच्या अध्यक्षते खाली पार पडली.या बैठकीस उपस्थित धनराज सोनवणे जिल्हा उपाध्यक्ष,जेष्ठ नेते रज्जाक सय्यद, राजेश सरवदे युवक आघाडी तालुकाध्यक्ष, जेष्ठ नेते परमेश्वर लांडगे,आदर्श जंगले युवक आघाडी तालुका उपाध्यक्ष परळी, बाळकृष्ण कसबे,शरद धिवार,जेष्ठनेते लिंबराज गायकवाड,प्रदिप गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
या बैठकीत बोलताना महासचिव मिलिंद घाडगे यांनी आवाहन केले की,परळी येथे २९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या सुजात दादा आंबेडकर यांच्या भव्य येल्गार महासभेसाठी केज तालुक्यातून बहुसंख्येने उपस्थित राहावे.ही केवळ सभा नसून बहुजन समाजाच्या हक्कासाठीचा एक ऐतिहासिक आवाज आहे.यावेळी त्यांनी सांगितले की,सुजात दादा आंबेडकर हे जिल्ह्यात पहिल्यांदाच येत असून,त्यांच्या नेतृत्वातून समाजाला नवा मार्गदर्शन मिळणार आहे.त्यामुळे ही सभा ऐतिहासिक ठरणार आहे.
हजारोच्या संख्येने आपण उपस्थित राहून बहुजन ऐक्याची ताकद दाखवावी.केज तालुक्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांमध्ये या यल्गार महासभेबद्दल प्रचंड उत्साह पाहायला मिळत असून, दि.२९ सप्टेंबरला परळीत होणारी यल्गार सभा बहुजन समाजाच्या ऐक्यासाठी मोठा टप्पा ठरेल,असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.



