सामाजिक
आंधळ्याचीवाडी येथील जेष्ठ महिला सोनाबाई आंधळे यांचे वृद्धापकाळा ने निधन

केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील आंधळ्याची वाडी येथील रहिवासी सोनाबाई नामदेवराव आंधळे वय १०५ वर्ष यांचे दि.२७ नोव्हेंबर २०२५ रोजी गुरुवारी संध्याकाळी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.त्यांच्या पार्थिवावर दि.२८ नोव्हेंबर शुक्रवार रोजी सकाळी आंधळ्याची वाडी येथील स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
विविध मान्यवरांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.सोनाबाई आंधळे यांच्यामागे सहा मुले,दोन मुली,सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे.त्या मुकदम जोतीराम आंधळे यांच्या मातोश्री होत. त्यांच्या निधनाने आंधळ्याची वाडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.



