अँड.सुभाष भाऊ राऊत यांनी घेतली गोरख देवडकर कुटुंबाची भेट घेऊन केले सांत्वन

बीड/प्रतिनिधी
ओबीसीचे आरक्षण गेले म्हणून आत्महत्या केलेल्या नाथापूर ता. बीड येथील कुंभार समाजाचे स्व.गोरख नारायण देवडकर यांच्या कुटुंबियांच्या सांत्वन भेटीसाठी ओबीसी महामंडळाचे माजी अध्यक्ष श्री. बापूसाहेब भुजबळ, समता परिषदेचे प्रदेश सरचिटणीस ॲड. सुभाष राऊत,रविभाऊ सोनवणे,कुंभार समाजा चे नेते अर्जुन दळे, दिलीप भुजबळ, सोलापूर जिल्हाध्यक्ष आबासाहेब खैरे,समता परिषद शहराध्यक्ष निखिल शिंदे,नितीन राऊत यांनी भेट दिली.
यावेळी ना.छगनरावजी भुजबळ यांनी या कुटुंबाची फोन वरून विचारपूस करून धीर दिला व मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी स्विकारली व एक लाख रुपये आर्थिक मदत केली.गोरख देवडकर मोल मंजूरी करून आपल्या मुलीला पोलिस भरती होण्यासाठी पैसे पुरवत होते आर्थिक परिस्थिती अत्यंत गरिबीची होती तरी पण कुठे तरी आपली मुलगी शिकावी लेकराला तरी शिकवावे पण सरकारने घात केला व मराठा समाजाला जीआर काढून ओबीसीत आरक्षण दिले आता माझी मुलगी कशी पोलिस होणार व ओबीसी आरक्षण गेले हया भितीने आत्महत्या केली.
लाखो गोरगरीब ओबीसी समाजातील तरुण तरुणी बेरोजगार आहेत. त्यांना नोकरी नाही ह्याचा सरकारने विचार करावा व मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्यावे, बोगस कुणबी प्रमाणपत्र देणे तात्काळ थांबवा व जीआर रद्द करा अशी मागणी परिवाराने व अँड.सुभाष भाऊ राऊत यांनी केली आहे.



