खा.बजरंग सोनवणेंची कार्यतत्परता ; बीडमध्ये उपोषणकर्त्यांशी संवाद साधत काढला मार्ग, गटसचिवांचा प्रश्न मार्गी, बंजारा समाजाला सोबत असल्याचा शब्द अन् गायरानधारकांना दिला दिलासा

बीड/प्रतिनिधी
बीड जिल्ह्यात कोणताही प्रश्न सोडविण्यासाठी खा. बजरंग सोनवणे धावून येत असल्याचे वारंवार पहायला मिळत आहे. दि.१२ सप्टेंबर रोजी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसलेल्या उपोषण कर्त्यांची खा.सोनवणे यांनी तत्परतेने भेट घेत प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले.यावेळी बीड जिल्हा देखरेख सहकारी संस्थेतील गटसचिवांचा प्रश्न मार्गी लावून तातडीने उपोषण सोडविले.याच बरोबर बंजारा समाजाला सोबत असल्याचा शब्द दिला.
दरम्यान,गायरान धारकांना तुमचा प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना बोलतो असे म्हणत दिलासा दिला.मागील काही दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालया समोर विविध मागण्यांसाठी उपोषणे सुरू आहेत.दि.१२ सप्टेंबर रोजी खा. बजरंग सोनवणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत असलेल्या उपोषण कर्त्यांची भेट घेतली.
यावेळी बीड जिल्हा देखरेख सहकारी संस्था,म.बीड येथे ८६ कर्मचारी कार्यरत असून मागील ४ ते ५ वर्षां पासून त्यांचे वेतन करण्यात आलेले नाही. असे असले तरी ते कामकाज पुर्ण करत आहेत.असे असताना त्यांना वेतन दिले जात नाही.सदरील कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यात यावे,यासाठी दि.८ सप्टेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे. खा. सोनवणे यांनी भेट दिल्यानंतर जिल्हा उप निबंधक यांनी उपोषण स्थळी येऊन पुढील २० दिवसात वेतनाचा प्रश्न मार्गी लावला जाईल असे लेखी दिले.यानंतर खा.बजरंग सोनवणे यांच्या हस्ते लिंबूपाणी देऊन उपोषण मागे घेण्यात आले.यावेळी उपोषणकर्ते ए.एल. उनवणे व उपोषणकर्ते उपस्थित होते.
यानंतर अखिल भारतीय बहूजन शेतकरी गायरान धारक न्याय हक्क संघर्ष मोर्चा च्या वतीने गायरान सातबारा मिळण्यासाठी करचुंडी येथील जयसिंग वीर यांच्या सुरू असलेल्या उपोषण स्थळी भेट देऊन वीर यांच्याशी संवाद साधला.वीर यांनी आपल्यावर होत असलेल्या अन्याया बाबत सविस्तर माहिती दिल्यानंतर मी तातडीने जिल्हाधिकारी यांच्याशी बोलतो,आणि आपल्या मागण्या बाबत कार्यवाही करावी अशा सुचना देतो असे म्हणत उपोषणकर्त्यांना दिलासा दिला.
यानंतर मराठवाड्यातील बंजारा समाजाला हैद्राबाद स्टेट गॅझेटिअर नूसार अनुसुचित जमाती प्रवर्ग आरक्षणाचा दर्जा देण्याबाबत सतिष पवार रा.कोळगाव तांडा यांच्या. उपोषणाला भेट दिली.यावेळी त्यांनी सतिष पवार यांची भेट घेत संवाद साधला.मी आपल्यासोबत आहे असेही खा. सोनवणे यांनी स्पष्ट केले. यावेळी बंजारा समाजातील तरूणांनी खा.सोनवणे यांचे टाळ्यांचा कडकडाट करत स्वागत केले.