प्रशासकीयसामाजिक

दलित अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे प्रशासनाला निवेदन पंचायत समिती इमारतीचे उद्घाटन करा स्वातंत्र्यसैनिक स्मारक व संविधान उद्देशीकेचा अपमान थांबवा – रोहित कसबे

केज/प्रतिनिधी

दलितअन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष रोहित कसबे यांनी दि.11 सप्टेंबर 2025 रोजी पंचायत समिती,केज येथील गट विकास अधिकाऱ्यांना निवेदन देऊन गंभीर आरोप नोंदवले आहेत.

निवेदनात म्हटले आहे की,पंचायत समिती कार्यालयाच्या परिसरात असणाऱ्या नवीन इमारतीचे उद्घाटन चार दिवसांत करावे अन्यथा दलित समाजाच्या लोकांच्या हस्ते उद्घाटन करुन त्यांना रहाण्या साठी जागा उपलब्ध करून देण्यात येईल .

तसेच पंचायत समिती प्रांगणातील स्वातंत्र्य सैनिकांचे स्मारक आणि संविधानाची उद्देशिका यांची विटंबना होताना दिसत आहे.असे समितीने आरोप केले आहेत.या शिवाय पंचायत समिती आवारात मटका जुगार दारु सारखे बेकायदेशीर प्रकार खुलेआम सुरू असल्याचा आरोप करत कसबे यांनी पुरावे आपल्याकडे आहेत.या सर्व बाबींकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

समितीने पुढे इशारा दिला आहे की,जर आठ दिवसात ठोस कार्यवाही झाली नाही, तर पंचायत समिती समोर तीव्र आंदोलन उभारण्यात येईल.या आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी संबंधित अधिकारी व प्रशासना वर राहील,असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

या निवेदनाची प्रत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.दलित अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष रोहित कसबे यांनी प्रशासनाने तातडीने कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!