प्रोफेसर विजय कोठेकर ज्ञानविज्ञान व्याख्यान मालेचे २ फेब्रुवारी ते ७ फेब्रुवारी रोजी आयोजन

केज/प्रतिनिधी
प्रोफेसर विजय कोठेकर ज्ञानविज्ञान व्याख्यान माला २०२६ चे आयोजन वनस्पतीशास्त्र विभाग बाबुरावजी आडसकर महाविद्यालय केज जिल्हा बीड व श्रीमती केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर महाविद्यालय बीड,शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय कळंब जिल्हा धाराशिव व कै. शंकरराव गुट्टे ग्रामीण कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय धर्मापुरी, तालुका परळी तसेच वसंतदादा पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय पाटोदा जिल्हा बीड यांच्या संयुक्त विद्यमाने प्रोफेसर विजय कोठेकर जीव विज्ञान शास्त्रातील व्याख्यानमाले चे आयोजन करण्यात येत आहे. या व्याख्यानमालेचे हे सलग तिसरे शैक्षणिक वर्ष आहे.
विज्ञानशाखेतील विद्यार्थी,प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी या सर्वांसाठी विज्ञानामधील नवनवीन संशोधन व मूलभूत संशोधन या विषयीचे अधिक माहिती होण्यासाठी या विज्ञान व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येत आहे.शैक्षणिक वर्ष २०२५-२६ या वर्षांमध्ये दिनांक २ फेब्रुवारी ते ७ फेब्रुवारी 2026 या कालावधी दरम्यान या व्याख्यानमालेचे आभासी पद्धतीने आयोजन करण्यात आलेले आहे. प्रोफेसर विजय कोठेकर ज्ञानविज्ञान व्याख्यान माला २०२६ चे उद्घाटन दिनांक २ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०-३० वाजता डॉ.सरस मॅडम, दयानंद अँग्लो वैदिक पदवीत्तर महाविद्यालय कानपूर उत्तरप्रदेश या करणार आहेत.
या सहा दिवसीय आभासी व्याख्यानमाले मध्ये विज्ञान विषयक नवनवीन संशोधनासंबंधी विज्ञान क्षेत्रातील उच्चशिक्षित मार्गदर्शकाचे मार्गदर्शन लाभणार आहे.प्रथम सत्राचे मार्गदर्शक प्रा.डॉ. इंद्राणी पाल,जैव तंत्रज्ञान विभाग,ब्रेनवेअर विद्यापीठ, कोलकत्ता पश्चिम बंगाल या मार्गदर्शन करणार आहेत.द्वितीय सत्राचे मार्गदर्शक प्रा.डॉ.शरद कांबळे वनस्पतीशास्त्र विभाग,मराठा विद्या प्रसारक समाज मंडळाचे, विज्ञान महाविद्यालय नाशिक.तृतीय सत्राचे मार्गदर्शक प्रा.डॉ. हितेशकुमार सोळंकी, विभागप्रमुख वनस्पती शास्त्र विभाग,गुजरात विद्यापीठ,अहमदाबाद. चौथ्या सत्राचे मार्गदर्शक डॉ.किरण जाधव,प्रमुख शेतीविषयक विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषीविद्यापीठ परभणी,चतुर्थ सत्राचे व्याख्याते प्रा.डॉ.देबश्री काकती,वनस्पतीशास्त्र विभाग,मंगलदायी महाविद्यालय,दरंग, आसाम व सहाव्या सत्राचे मार्गदर्शक प्रोफेसर डॉ. नितीन लभाने,वनस्पती शास्त्र विभाग,भवन विज्ञान महाविद्यालय, अंधेरी मुंबई हे असणार आहेत.
विज्ञानामधील नवसंशोधनावर आधारित या व्याख्यान मालेमध्ये विद्यार्थी व संशोधन मार्गदर्शक यांच्यामध्ये विचारांची, संशोधनाची देवाण-घेवाण व्हावी विद्यार्थी संशोधकांना विज्ञानामधील नवीन प्रवाह व त्यामधील संधी याची ओळख व माहिती व्हावी या अनुषंगाने या विज्ञानविषयक व्याख्यान मालेचे आयोजनकरण्यात येत आहे.प्रोफेसर विजय कोठेकर ज्ञानविज्ञान व्याख्यानमाला २०२६च्या यशस्वीतेसाठी महा विद्यालय व विद्यापीठा तील विज्ञान विषयाच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी,संशोधकांनी व प्राध्यापकांनी यामध्ये आभाशी पद्धतीने सहभागी होऊन आपले विज्ञान विषयक ज्ञान वृद्धिंगत करावे असे आवाहन मुख्य संयोजक प्रोफेसर डॉ.नवनाथ काशीद,वनस्पतीशास्त्र विभाग,बाबुरावजी आडसकर महाविद्यालय केज जिल्हा बीड यांनी केले आहे.
या विज्ञान विषयक सहादिवशीय व्याख्यानमालेच्या आयोजनास श्री.छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था आडसचे सचिव श्री. रमेशरावजी आडसकर साहेब,संस्थेच्या तज्ञ संचालक सौ.अर्चनाताई आडसकर,महा विद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव फावडे,या व्याख्यान मालेमध्ये सहभागी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिवानंद क्षीरसागर बीड,डॉ. ताराचंद होळंबे धर्मापुरी, डॉ.हेमंत भगवान कळंब व डॉ.बळीराम राख पाटोदा यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.



