प्रख्यात बालरोगतज्ज्ञ डॉ.रामकृष्ण लोंढे यांचे दुखःद निधन

केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील भुमी पुत्र तथा कळंब शहरा तील सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी प्रदेशाध्यक्ष,रोटरी क्लब ऑफ कळंब सिटीचे माजी तालुकाध्यक्ष तसेच प्रगतशील शेतकरी डॉ.रामकृष्ण लोंढे यांचे दुःखद निधन झाले.त्यांच्या निधनाची वार्ता कळताच कळंब तालुक्यासह बीड जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.डॉ.लोंढे यांनी आरोग्य,सामाजिक व कृषी अशा अनेक क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केले.
बीड, परभणी व धाराशिव जिल्ह्यातील बालरोग तज्ज्ञ म्हणून त्यांनी अत्यंत मोलाचे योगदान दिले.ग्रामीण भागातील रुग्णांसाठी ते देवदूता सारखेच होते.जिथे कुठे उपचार मिळत नसत, तिथे शेतकऱ्यांचा आधार म्हणून लोक डॉ. लोंढे यांच्यादवाखान्यात धाव घेत असत.
रुग्णसेवेसोबत त्यांचे कार्य,त्यांची संवेदन शीलता आणि सेवाभाव अमूल्य होते.त्यांच्या अचानक निधनाने कळंब तालुका आणि संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.सामाजिक व वैद्यकीय क्षेत्राला मोठा धक्का बसला असून त्यांच्या स्मृतीस सर्व स्तरातून आदरांजली वाहिली जात आहे.



