आंबेडकरवादी नवा राजकीय पक्ष स्थापन करणार – बा.रा.वाघमारे

नांदेड/प्रतिनिधी
महाराष्ट्रातील बहुजन समाजाला राजकीय सत्तेत निर्णायक स्थान मिळवून देण्यासाठी आंबेडकरवादी विचारांवर आधारित एक नवा राजकीय पक्ष लवकरच स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा अण्णा भाऊ साठे पीपल्स फोर्स चे संस्थापक बा.रा. वाघमारे यांनी केली.ते राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त आयोजित संघर्ष नायिका पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड. सुजाताताई पोहरे होत्या. यावेळी परभणी येथील कोठडी मृत्यू प्रकरणातील वीरमाता विजयाताई सूर्यवंशी व बारामतीच्या नवनिर्वाचित नगरसेविका संघमित्रा चौधरी यांची विशेष उपस्थिती होती.
या सोहळ्यात राज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ५० कर्तबगार महिलांना ‘संघर्ष नायिका पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्र संचालन बालाजी गवारे यांनी केले,तर प्रा.ब.ना. गोईनवाड गडगेकर यांनी आभार मानले. कार्यक्रमास महिला, पुरुषांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.



