अध्यात्मिक

नरदेहाची किंमत कळण्यासाठी परमार्थाची गरज- ह.भ.प.स्मिता आजेगांवकर

अंबाजोगाई/प्रतिनिधी

माणूस जन्माला येतो, लहानाचा मोठा होतो. पुढे सुख दुःखाची अनेक वादळे झेलत आयुष्य जगतो.पण आयुष्य का जगतो? कशासाठी जगतो? आणि कुणासाठी जगतो? याची मात्र काहीच कल्पना नसते हे सत्यच आहे नरदेहाची किंमत कळाली पाहीजे या साठीच परमार्थ आहे आणि तो साधण्याचे काम मनुष्य जीवनातून व्हावे असे मत प्रख्यात महिला किर्तनकार ह.भ.प.स्मिता आजेगांवकर यांनी व्यक्त केले.

किर्तन महोत्सवा निमित्ताने त्या बोलत होत्या . हरिभक्ती पर किर्तनात विवेचन करताना त्या म्हणाल्या की,मृत्यूनंतर पृथ्वीतला वरचं मनुष्याच अस्तित्व कायमचंच संपुष्टात येतं संत हे अध्यात्मा प्रमाणे जीवन जगले म्हणून त्यांची आठवण येतच राहते.कारण ते त्यांनी मिळवले आहे.अध्यात्म सांगत जगावं तर ते समाजासाठी तुम्ही कोणत्या समस्या सोडवता? तुम्ही परिवारावर काय संस्कार करता? तुम्ही कुणाच्या कामी येता? हेच तुमच्या जीवनाचे सार मृत्यू नंतर कळते.

स्वतःच्या पलीकडे जाऊन जेव्हा मनुष्य विचार करतो म्हणजे तो शिक्षण घेतो असं म्हणतात.जीवन जगताना संकुचित विचार नसला पाहीजे जगण्यात समाजाचा विचार म्हणजेचआयुष्य होय.खूप पैसा,प्रतिष्ठा, चांगला स्वभाव, क्षणिक व भौतिक सुखाची साधने आहेत.ती आता असतील पुन्हा नसतील विशेष म्हणजे यातील एकही वस्तू तुम्ही निर्वाणानंतर तुमच्या सोबत घेऊन जाऊ शकत नाहीत.

समाजाची आपुलकी, आणि वर्षानुवर्षे निघणारी आठवण हीच आयुष्यभराची कमाई असते साधु संत स्मरणात राहतात कारण त्यांचे जगणे हे समाजासाठी असते. संतांनी ग्रंथाव्दारे जगाला अनमोल शिकवण दिली. लाभलेल्या नरदेहाचे सार्थक झाले पण सामान्य माणूस भवसागरातच इतका अडकतो की ना उपासना ना सखोल ज्ञान ना अनुभव प्राप्त होतो.किर्तनाच्या उत्तररंगात त्यांनी समर्थ रामदास स्वामी यांच्या जीवन कार्याचा परिचय करून दिला.

स्मिता आजेगांवकर यांचे स्वागत जयश्री गोस्वामी,मनिषा गोस्वामी यांनी केले. हार्मोनिअमसाठी बी.के. पांडे,तबल्यासाठी रत्नदिप शिगे यांनी साथसंगत केली.सार्थक गोस्वामी यांनी आभार मानले.यावेळी रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुरूवातीला किर्तन महोत्सवाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा, लक्ष्मीकांत गोस्वामी, शैलेष कुलकर्णी आदींच्या उपस्थितीत करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!