शैक्षणिक

साने गुरुजी निवासी विद्यालयात गांधी तिर्थ परिक्षा संपन्न,विद्यार्थी व शिक्षकांचा सहभाग 

केज/प्रतिनिधी

साने गुरुजी निवासी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय केज येथे गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव यांच्या उपक्रमा अंतर्गत होणा-या गांधी संस्कार परिक्षेचे आयोजन करण्यात आले.दि.१० जानेवारी २०२६ रोजी परिक्षाचे आयोजन करण्यात आले होते.

यात इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतच्या वर्गातील १०२ विद्यार्थी व १० शिक्षकांनी सहभाग नोंदवला परिक्षा समन्वयक संकुलाच्या प्राचार्या डॉ.कविता गित्ते – कराड यांनी पार पाडली तसेच सुवर्णा सिरसट, दाजी जयदेवी,डोंगरे चंपकला,गुजर लिंबराज, पवार ज्ञानेश्वर तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले परिक्षेकरीता बसलेल्या विद्यार्थ्यांचे मुल्यमापन करून वर्ग निहाय प्रथम,व्दितीय, तृतीय क्रमांक काढण्यात येणार आहेत आणि सर्व निकाल गांधी तिर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय प्रतियोगिता जळगाव यांच्याकडे पाठवण्यात येणार आहे तसेच या परिक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!