शैक्षणिकसामाजिक

पैठण (सावळेश्वर) येथे केंद्रस्तरीय क्रीडा व विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे उत्साहात संपन्न,विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमातून मान्यवरांचे लक्ष वेधले 

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील पैठण (सावळेश्वर) येथे जिल्हा परिषद शाळा टिकविण्या च्या उद्देशाने व विद्यार्थ्यां मधील शारीरिक,बौद्धिक व सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी केंद्रस्तरीय क्रीडा व विविध गुणदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.या कार्यक्रमात केंद्रातील १३ शाळांतील विद्यार्थी सहभाग नोंदवला होता.

या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून पैठण येथील सरपंच जयश्रीताई चौधरी होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून संजय चौरे, ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी गट साधन केंद्र केज,अर्जुन बोराडे केंद्र प्रमुख,बनसारोळा, अण्णासाहेब जाधव केंद्र प्रमुख,पैठण,देवीदास नागरगोजे केंद्रिय मुख्याध्यापक बनसारोळा बाळासाहेब चव्हाण केंद्रिय मुख्याध्यापक, होळ,गोविंद मुळे केंद्रिय मुख्याध्यापक,पैठण यांची प्रमुख उपस्थिती होती.

या कार्यक्रमात धावणे, उंचउडी,लांबउडी,कबड्डी, खो-खो आदी क्रीडा स्पर्धांसह शिवरायांच्या वाघिणी आम्हीशिवकन्या, उठो जवान देश के, वसुंधरा पुकारती,उदो ग अंबे उदो,रविवार माझ्या आवडीचा,सुनो गौर से दुनियाँवालो,चिऊ ताई चिऊ माझ्या अंगणात ये, गाडी घुंगराची अशा विविध गाण्यांवर विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमातून मान्यवरांचे लक्ष वेधले.त्यामुळे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना आपले कौशल्य सादर करता आले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन बालासाहेब गोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन गोविंद मुळे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!