शासकीय तंत्रनिकेतन, बीड येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन व प्रबोधनकार ठाकरे जयंती उत्साहात साजरी

बीड/प्रतिनिधी
शासकीय तंत्रनिकेतन, बीड येथे आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन व प्रबोधनकार ठाकरे जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी साडे सात वाजता प्राचार्य डॉ. ए. के. वाघमारे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यानंतर उपस्थितांनी सामूहिकरित्या महाराष्ट्र गीताचे गायन करून राज्याच्या वैभवाचा गौरव व्यक्त केला.
या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये मराठवाडा मुक्ती संग्रामातील शौर्यगाथा तसेच प्रबोधनकार ठाकरे यांच्या वैचारिक कार्याची माहितीदेण्यात आली.प्रबोधनकार ठाकरे हेसमाजसुधारक, पत्रकार आणि लेखक म्हणून महाराष्ट्राच्या वैचारिक परंपरेतील थोर व्यक्तिमत्त्व मानले जातात.त्यांनी ‘प्रबोधन’ नियतकालिकातून समाजजागृती केली. अस्पृश्यता निवारण, हुंडाबंदी,अंधश्रद्धा निर्मूलन यांसाठी त्यांनी कार्य केले. ‘भिक्षुकशाहीचे बंड’ सारख्या ग्रंथातून त्यांनी समाजातील अनिष्ट प्रथा व कर्मकांडावर कठोर प्रहार केला.
या कार्यक्रमास विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.तसेच विभागप्रमुख बनसोडे यू.व्ही. यंत्र अभियांत्रिकी,गिते बी. एम. विद्युतअभियांत्रिकी,वीर एस.बी. संगणक अभियांत्रिकी, गावडे पी. बी.अनुविद्युत,सोहेल सय्यद स्थापत्य व अभिजीत जाधव मुद्रण तंत्रज्ञान यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन जिमखाना उपाध्यक्ष वाघ डी.जी. आणि सहाय्यक पवार विवेक यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे प्रसिद्धी प्रमुख थीगळे व्ही.जी आणि देशमुख व्ही.एस यांचे विशेष सहकार्य लाभले. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.



