ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी केज मध्ये 19 सप्टेंबर रोजी मोर्चाचे आयोजन

केज/प्रतिनिधी
ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी केज शहरामध्ये भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.ओबीसी नेते प्रा.लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे, बळीराम खटके यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवार दि.19 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता जय भवानी चौक (धारूर चौक) केज या ठिकाणी मोर्चाला सुरुवात होणार आहे.केज येथे लक्ष्मण हक्के यांच्या नेतृत्वा खाली ओबीसीआरक्षण बचाव मोर्चा काढण्यात येणार आहे.
पोलिसांनी या मोर्चाला परवानगी दिलेली आहे.मोठ्या संख्येने ओबीसी समाजातील नागरिक या मोर्चात सहभागी होतील असा सर्वांना विश्वास आहे.हा मोर्चा मराठा आरक्षणासाठी जारी करण्यातआलेल्या शासन निर्णयाच्या विरोधात आहे. आंदोलकांचा आरोप आहे की हा निर्णय ओबीसी आरक्षणाला धोका निर्माण करतो. हा जीआर ओबीसीचे आरक्षण संपुष्टात आणणारा आहे.ही लढाई ओबीसीच अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी आहे.
ओबीसी समाजात एकूण 374 जातींचा समावेश आहे.त्यात महाराष्ट्रात 35% असलेला मराठा समाजाचा समावेश केला तर लाभ कोणालाही होणार नाही.विद्यार्थ्यामध्ये केवळ स्पर्धा आणि स्पर्धाच होईल.मुळातच आरक्षण हे मागासलेला समाजाला पुढे आणण्यासाठी देण्यात आलेले आहे. शैक्षणिक, व सामाजिक विकास व्हावा यासाठी आरक्षण लागू करण्यात आलेले आहे.
महाराष्ट्र सरकारने मराठा समाजातील जे गरीब लोक आहेत त्यांच्या साठी 10% जागा राखीव दिलेल्या आहे.यामुळे ओबीसी समाजाला जे सोयी- सवलती मिळतात त्या सर्व मराठा समाजाला देखील मिळतात.त्या नंतरही ओबीसी प्रवर्गा तच समावेश करावा ही मागणी योग्य वाटत नाही.प्रत्येक गावात सर्वात जास्त मराठा समाज असतो.त्यामुळे तेथील सरपंच,किंवा आमदार इत्यादी हे मराठा समाजाचेच निवडून येतात.सत्तेत सर्वाना प्रतिनिधित्व मिळावे म्हणून काही मतदारसंघ हे ओबीसी, एस सी,एस टी इत्यादी साठी राखीव ठेवलेली आहे.याठिकाणी ओबीसींना प्रतिनिधित्व मिळणारच नाही.
एकूण 35% मराठा समाजा तील 20 % मराठा हे कुणबी असून त्यांना ओबीसी प्रवर्गात समाविष्ट केलेलेच आहे. तमाम महाराष्ट्रातून या मोर्चात लोक सहभागी होणार आहेत.ओबीसी चे न्याय,हक्क, आरक्षण, संरक्षण, व आपल्या लेकरांच्या भविष्यासाठी आपल्या भागातील लहान थोर प्रतिष्ठित नागरिक महिला भगिनी यांनी मोठ्या संख्येने हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सकल ओबीसी समाज केज तालुका यांच्या वतीने करण्यात आले आहे.



