अध्यात्मिक

उत्तरेश्वर पिंपरी येथे महाशिवरात्री निमित्त यात्रा महोत्सव

केज /प्रतिनिधी

मराठवाड्यातील भाविकांचे श्रद्धास्थान केज तालुक्यातील प्रसिद्ध तिर्थक्षेत्रउत्तरेश्वर (हनुमंत) पिंपरी या ठिकाणी १४ वर्षाच्या वनवास काळात प्रभु रामचंद्राने स्थापन केलेले पुरातन शिवलिंग असून या ठिकाणी जटायु पक्षाची उत्तर क्रिया करतांना स्थापन केलेले शिवलिंग असल्यामुळे उत्तरेश्वर असे नामकरण झालेले आहे अशा प्रकारची अख्यायिका आहे.

शिवलिंगाच्या उजव्या बाजुस एक आड (विहीर) असुन या आडात पूर्वी दरवर्षी महाशिवरात्री पर्व काळामध्ये काशीतीर्थ म्हणजे श्वेत जल यायचे असेही पूर्वजाकडून ऐकीवात आहे.उत्तरेश्वर महादेव शिवलिंग हे जागृत देवस्थान असुन त्याची परिचिती अनेक भक्ताकडून प्रत्यक्ष अनुभवात असुन या मंदिरात आजही अध्यात्मिक पावित्र्य राखणेसाठी मंदिरातील गाभाऱ्यात भक्तांना ओल्या कपड्यानेच जावे लागते.तसेच ३६५ दिवस २४ तास तुपाचा नंदादिप, दररोज दोन वेळा पुजा, सायंकाळी आरती केली जाते,विना प्रहर देखील आजतागायत चालु आहे.

श्रावणमहिन्यात सोमवारी व प्रत्येक महिन्याच्या अमावास्येला यात्रा भरत असून सायंकाळी बारा जोतीलिंगाची आरती होऊन किर्तन व भजनादी कार्यक्रम होतात.या वेळी भाविक दर्शनासाठी येत असतात.विसाव्या शतकातील महान संत कै.ह.भ.प.गुरुवर्य श्री ज्ञानेश्वर माऊली (दादा) उत्तरेश्वर पिंपरीकर यांनी देखील याच शिवलिंगाची नित्यनेमानेपुजा,आराधना,ध्यान,उपासने बरोबरच विविध अध्यात्मिक उपक्रम राबवून मंदिर जिर्णोध्दार,प्रचार,प्रसार केला होता.ग्रामीण भागातील अध्यात्मिक समाधानाचे बीड जिल्ह्यातील नव्हे तर मराठवाडयातील एकमेव ठिकाण आहे.

या पावन पवित्र ठिकाणी माघ महिन्यात महाशिवरात्री पर्वकाळावर पाच दिवस मोठ्या प्रमाणात यात्रोत्सव सोहळा अत्यंत उत्साहात साजरा होत असतो,महाशिवरात्री पर्वकाळ असून यात्रे निमीत्त सुशोभीकरण करण्यात आले आहे त्यामध्ये संपूर्ण मंदिरास आतून बाहेरून मंदिर ट्रस्टीकडून रंगकाम करण्यात आले असून संपूर्ण मंदिरावर विद्युत रोषणाई,भाविक भक्तांना दर्शन रांगेत उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून भव्य मंडप उभारुन त्या मंडपातच दर्शन रांगेची व्यवस्था,पालखी मंडप, संपर्कासाठी मंदिरासमोर पालखी सोहळा व संपर्क मंडपाची उभारणी करण्यात आलेली आहे.

ग्रामपंचायतचे सरपंच श्री. सचिन अशोकराव चंदनशिव, सोसायटीचे चेअरमन श्री.महेश लक्ष्मणराव चंदनशिव व त्यांचे सदस्य सहकारी यांनी गावातील सर्व पथदिवे नवीन बसवून लाईटची चोख व्यवस्था केलेली आहे.तसेच आमदार फंडातून अंडर ग्राऊंड नाल्या करुन पक्के सिमेंट रस्ते व भाविक भक्तांसाठी विविध ठिकाणी पाण्याची व्यवस्था,यात्रेचे स्वरूप मोठे असल्यामुळे कोणालाही त्रास होऊ नये सर्व व्यवस्थित पार पाडण्यासाठी ग्राम पंचायत मार्फत मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.

महाशिवरात्री पर्वकाळाची सुरुवात दि.१५ फेब्रुवारी २०२६पासून होत असुन ग्रामस्थ,बीड जिल्यासह मराठवाडयातील विविध ठिकाणाहून मोठ्या प्रमाणावर आलेले भाविक शिवलिंगाला अभिषेक करून आपली कनोकामना पूर्ण करतात. यात्रोत्सवातील मुख्य गाभा किवा आकर्षण म्हणजे महाशिवरात्री पर्वकाळावर निधणारी श्री उत्तरेश्वर बाबांचा पालखी सोहळा, त्याची सुरुवात सायं ९ ते ११.३० हरि किर्तनापासून होते.

त्यामध्ये महादेवाची महती गायली जाते व नंतर १२ ते सकाळी ६ वाजेपर्यंत श्री उत्तरेश्वर बाबांचा पालखी सोहळा सुरु होतो.सदर सोहळ्यात निमीत्त विविधपरिसरातुन दिंड्या येतात,पालखी समोर गावातील भजनी मंडळासह सदर दिंड्यांचा भारुड,अभंग,पावले, फुगडी,विविधअध्यात्मिक कला अविष्कार साजरा होतो.

पालखी समोर तुपाचे दिप प्रज्वलीत केले जातात तसेच फटाक्यांची अतिशबाजी करुन पालखीची शोभा वाढवली जाते.असे विविध कार्यक्रम साजरे होत असून पालखी दर्शन व कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भावीक उपस्थित राहतात. या पर्वकाळामध्ये ह.भ.प. नारायण महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते. यावर्षी सप्ताहाची सुरुवात १२ फेब्रुवारी गुरुवारी होत असून सप्ताहाची सांगता ह.भ.प.नारायण महाराज यांच्या काल्याच्या किर्तनाने १८ फेब्रुवारी होत आहे.नंतर महाप्रसादाचे आयोजन केले जाते.शिवरात्री

यात्रेनिमीत्त विविध प्रकारचे व्यापारी त्यात खेळणी,भांडयाचे, कपड्यांचे स्टॉल,हॉटेल्स, खानावळी,रसवंती, बुरुडाची दुकाने,फैन्सी वस्तुंचे स्टॉल हजेरी लावतात,तसेच तरुण वर्गसिंह लहान बालकांना मौज-मजा करणे साठी आकाशाला भिडणारे रहाट पाळणे,मौत का कुंवा,सर्कस,रेल्वे लहान मोठे विविध प्रकारचे या वर्गातील सर्व खेळ साहित्या बरोबरच भेळ, ज्यूस,विविध प्रकारचे कोल्ड्रींक्सचे अनेक स्टॉल या ठिकाणी दरवर्षी आपली हजेरी लावतात त्यामुळे ग्रामीण भागातील तरुण वर्गासह लहान मुलांना या ठिकाणी आनंदाची पर्वणीच असते.

ग्रामीण भागातील तरुण वर्गासह सर्व शेतकरी वर्गासाठी लोककला मंडळाचे मनोरंजनाचे कार्यक्रम होतात.ग्राम पंचायत मार्फत या सर्वांना जागा,पाणी तसेच विविध प्रकारच्या आवश्यक सोई सुविधा पुरवल्या जातात. भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून एसटी महा मंडळाच्या धारूर,कळंब, धाराशिव,बीड बसडेपो तुन बसेसची व्यवस्था केली जाते.तसेच पोलिस प्रशासनाद्वारे कडक बंदोबस्त केला जातो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!