
केज/प्रतिनिधी
दिनांक 29 आॕगष्ट 2025 रोजी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बीड यांच्या वतीने क्रीडा दिना निमित्त राष्ट्रीयपातळीवर प्राविण्य प्राप्त व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या प्रशिक्षक व मार्गदर्शकांचा सन्मान जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बीड येथे करण्यात आला.यात बीड जिल्ह्यातील विविध खेळात राष्ट्रीय पातळीवर प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सन्मान व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या मार्गदर्शकांचा व प्रशिक्षकांचा देखील सन्मान जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन,जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर सर, छत्रपती पुरस्कार प्राप्त जे पी शेळके सर व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.यात साने गुरुजींच्या दहा विद्यार्थ्यांचा खेळाडूंचा समावेश होता पैकी पाच खेळाडू उपस्थित झाल्याने पाच खेळाडूंचा माननीय जिल्हाधिकारी यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
सदर खेळाडू हे राष्ट्रीय स्तरावर बेसबॉल व सॉफ्टबॉल या खेळात 2024 मध्ये प्राविण्य प्राप्त खेळाडू होत. तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या डॉ.कविता गिते यांचा देखील सन्मान करण्यात आला या शाळेने क्रीडा क्षेत्रात उत्तुंग अशी कामगिरी करत महाराष्ट्र राज्यात क्रीडा क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे. मागील पाच वर्षात 35 विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पातळीवर प्राविण्य प्राप्त होऊन सदर विद्यार्थी शासनाच्या खेळाडू आरक्षणात पाच टक्के मध्ये वर्ग २ या पदासाठी पात्र आहेत.तर 165 विद्यार्थी शासनाच्या पाच टक्के खेळाडू आरक्षणात वर्ग ३,वर्ग ४ या पदासाठी पात्र आहेत.तसेच जिल्हा पातळी राज्य विभाग पातळी राज्य पातळीवरील सहभाग यात जवळपास 300 खेळाडूंचा सहभाग आहे.
या सर्वांना संस्थेने खेळाच्या सर्व भौतिक सुविधा योग्य मार्गदर्शक उपलब्ध करून दिल्याने हे शक्य झाले आहे.या सर्व खेळाडूंना मार्गदर्शक कविता गित्ते मॅडम,क्रीडा शिक्षक रामदास सानप, क्षितिजा मॅडम,क्रीडा मार्गदर्शक बीड जिल्हा क्रीडा कार्यालय श्री.रेवन्नाथ शेलार यांचे मार्गदर्शन लाभत आहे. क्रीडा दिनी झालेल्या सन्मानामुळे संस्थाध्यक्ष ॲड.उद्धवराव कराड सर,राजेश कापसे सर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.


