सामाजिकसांस्कृतीक

वक्रतुंड गणेश मंडळाचे रक्तदान शिबीर आणि सर्व रोग निदान शिबीर संपन्न,भाविकांनी घेतला सक्रिय सहभाग 

केज/प्रतिनिधी

मागील 16 वर्षांपासून सातत्याने समाज उपयोगी उपक्रम राबवणारे वक्रतुंड गणेश मंडळाचे रक्तदान शिबीर आणि सर्व रोग निदान शिबीर दि.30 आॕगष्ट शनिवार रोजी संपन्न झाले 15 रक्त दात्यांनी रक्तदान केले तर 50 जणांनी रोग निदानासाठी महालॅब ला रक्त दिले.

शनिवार दि.30 ऑगस्ट रोजी वक्रतुंड गणेश मंडळाच्यावतीने जिल्हा रुग्णालय बीड च्या टीम च्यावतीने रक्त संकलना साठी आले होते.यावेळी अनिरुद्ध कोकीळ व अंकिता कोकीळ या बहीण भाऊ यांनी पहिल्यांदा रक्तदान केले अक्षय काळे,श्वेता अंधारे,आदर्श ठोंबरे, निखिल अंधारे यांनी पहिल्यांदाच रक्तदान केले तर नियमित रक्त दान करणारे अशोक सोनवणे,धनंजय कुलकर्णी,संजय कोरडे, शिवराज मुथळे,विष्णू कोरडे,सागर चाळक, शंकर कसबे,महेश जाधव,संतोष काळे या पंधरा जणांनी रक्तदान केले.

तर महालॅब उप जिल्हा रुग्णालय केज च्या वतीने लिपिड प्रोफाइल रोग निदान साठी 50 जणांचे रक्त संकलित केले दोन दिवसात सर्वांचे रिपोर्ट येतील व ज्यांना आवश्यक असेल त्यांच्यावर केज येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार केले जातील. रक्तदान शिबीरा साठी बीड जिल्हा रुग्णालय ची टीमने सहकार्य केले तर महालॅब साठी केज उपजिल्हा रुग्णालयाची टीम यांनी सहकार्य केले.श्रीकिसन नागरगोजे यांनी आंदोलनात असतानाही मंडळाच्या पदाधिकारी यांच्या आग्रहास्तव सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!