केज येथे प्रो.डॉ.मिलिंद आवाड यांची रिपब्लिकन पार्टी कार्यालयास सदिच्छा भेट

केज/प्रतिनिधी
जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जे.एन.यु. नवी दिल्ली)येथील प्राध्यापक व चळवळी तील कार्यकर्ते प्रो.डॉ. मिलिंद आवाड यांनी नुकतीच केज तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(A)कार्यालयाला सदिच्छा भेट दिली.डॉ. आवाड यांच्या आगमनाने रिपब्लिकन कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण पसरले.या भेटीत सामाजिक, शैक्षणिक व राजकीय विषयांवर सविस्तर चर्चा झाली.
डॉ.आवाड यांनी आपल्या संवादात सांगितले की, सामाजिक न्यायाची ग्वाही देणारे संविधान हेच देशाचे मार्गदर्शक तत्त्व आहे.समाजातील वंचित घटकांच्या सबलीकरणासाठी शिक्षण हीच खरी गुरुकिल्ली आहे. युवकांनी शिक्षण आणि संघटित चळवळीच्या माध्यमातून परिवर्तन घडवून आणणे ही काळाची गरज आहे.
या प्रसंगी तालुका अध्यक्ष सुनीलजी हिरवे,शेकापचे भाई मोहन गुंड,ज्येष्ठ नेते बाबुराव गालफाडे सर, महादेव ढवारे,मराठा आघाडी व अन्य कार्यकर्ते,ज्येष्ठ नेते शरद थोरात,पांडुरंग कसबे,अमोल मस्के यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन व उत्स्फूर्त स्वागत करून डॉ.आवाड यांचा गौरव केला.
यावेळी बोलताना स्थानिक नेत्यांनी सांगितले की,डॉ.आवाड यांच्या विचारसरणीमुळे ग्रामीण भागातील तरुणांना नवा दृष्टिकोन मिळत असून,समता, बंधुता आणिसामाजिक प्रगतीसाठी त्यांच्या मार्गदर्शनाचा फायदा स्थानिक चळवळींना होईल.डॉ.आवाड यांच्या सदिच्छा भेटी मुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) च्या कार्यकर्त्यांत नवचैतन्य निर्माण झाले असून, पुढील काळात सामाजिक उपक्रम राबविण्यास या भेटीचा निश्चितच उपयोग होणार आहे असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.



