अध्यात्मिक

नवी दिल्ली येथील भारती विद्यापीठात ह.भ.प.समाधान महाराज शर्मा यांच्या प्रवचनाचे आयोजन 

केज/प्रतिनिधी

नवी दिल्ली येथील भारती विद्यापीठ कर्मचारी गणेशोत्सव मित्र मंडळ यांच्या वतीने 23 व्या स्थापना वर्षा निमित्त किर्तनकार, व्याख्याते,प्रवचनकार, वरीष्ठ मार्गदर्शक यांच्या प्रथम पर्वा निमित्त दि.1 सप्टेंबर 2025 रोजी सोमवारी केज येथील ठाकूर श्री रामकृष्ण परमहंस परिवाराचे सुप्रसिद्ध विविध कथाकार भावरत्न गुरुदास ह.भ.प. समाधान महाराज शर्मा यांचे प्रवचन आयोजित करण्यात आले आहे.

या प्रवचनात संत साहित्य,भागवत धर्म तसेच आधुनिक  समाज जीवनातील अध्यात्माचे महत्त्व यावर समाधान महाराज आपले विचार मांडणार आहेत. भक्तीभाव , जीवनमूल्ये व सामाजिक बांधिलकी या त्रिसूत्रीवर आधारीत त्यांचे कथन श्रोत्यांना आत्मिक उर्जा देणारे ठरणार आहे,अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

भारती विद्यापीठ शैक्षणिक संकुल ए-4 पश्चिम विहार,न्यु रोहतक रोड, नवी दिल्ली 110063 (पश्चिम विहार ईस्ट मेट्रो स्टेशन जवळ) या परिसरात हे प्रवचन रात्रौ 7-30 वाजता आयोजित करण्यात आले असून विद्यार्थी, प्राध्यापक व भाविक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भारती विद्यापीठ कर्मचारी गणेशोत्सव मित्र मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!