केजचे भुमीपुत्र विनोद गुंड चा जिल्हाधिकारी विवेक जाॕन्सन यांच्या हस्ते सत्कार

केज/प्रतिनिधी
केज शहरातील भुमीपुत्र विनोद गुंड यांचा क्रिडा क्षेत्रातील योगदानाबद्दल बीडचे जिल्हाधिकारी विवेक जाॕन्सन यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला याबाबत सविस्तर माहिती अशी की,बीड जिल्हा क्रीडा कार्यालया च्या वतीने राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला.
यावेळी बीड जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केलेल्या मान्यवर क्रीडा संघटक व क्रीडा प्रशिक्षक व क्रीडा संयोजक म्हणून कामगिरी केल्याबद्दल विनोद गुंड यांचा दि.29 आॕगस्ट 2025 रोजी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त बीडचे जिल्हाधिकारी श्री. विवेक जाॅन्सन यांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी बीड जिल्हा क्रीडा अधिकारी श्री.अरविंद विद्यागर प्रा.जनार्दन शेळके तसेच या कार्यक्रमाला बीड जिल्ह्यातील खेळाडू व क्रीडा प्रेमी यांची उपस्थिती होती.
यावेळी प्रतिनिधीशी बोलताना विनोद गुंड यांनी सांगितले की,जिल्हा अधिकारी यांच्या कडून आपला सन्मान झाला याबद्दल प्रशासनाला धन्यवाद देतो तसेच या मुळे क्रीडा क्षेत्रात अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे असे त्यांनी सांगितले आहे.



