सामाजिक

केज येथील वक्रतुंड गणेश मंडळाच्या वतीने काशीदवाडी येथे वड, पिंपळ,उंबराच्या सीड बॉलचे रोपण, काशीदवाडी येथे वनराई बहरणार

केज/प्रतिनिधी

केज शहरातील प्रशांत नगर भागात असणारा वक्रतुंड गणेश मंडळ हा गेली सोळावर्षे आपल्या विविध कार्यक्रमातून सामाजिक सलोखा जपत आहे तसेच नैसर्गिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. सातत्याने वक्रतुंड गणेश मंडळाच्या वतीने समाज उपयोगी उपक्रम राबवले आहेत.

शुक्रवार दिनांक 29 आॕगष्ट रोजी वक्रतुंड गणेश मंडळा च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून वृक्षारोपण करण्यासाठी काशीदवाडी येथील डोंगरात 200 सीडबॉल चे रोपण करण्यात आले.या सीडबॉलच्या माध्यमातून वड,पिंपळ उंबर आदी पर्यावरण पूरक वृक्षांची लागवड केली गेली.यावेळी काशीदवाडी चे सरपंच महादेव जाधवर हे उपस्थित होते.या सीड बॉल च्या माध्यमातून वातावरणात ऑक्सिजनची निर्मिती करणारे व भारतभूमी तील नैसर्गिक झाडे लावण्याचा हा प्रयत्न वक्रतुंड गणेश मंडळा च्या वतीने करण्यात आला.

यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांनी सांगितले की डॉल्बी ही आपली संस्कृती नाही. त्यामुळे गणपती उत्सवात डॉल्बी वगैरे लावू नये तसेच आपली संस्कृती जपत सामाजिक बांधिलकी जपत आपला सांस्कृतिक वारसा जपला पाहिजे याचा फायदा आपल्या भागातील नागरिकांना यांचा लाभ झाला पाहिजे चांगली विचार सरणी जोपासली पाहिजे.शारीरिक, मानसिक आरोग्य जोपासले पाहिजे यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असणारे कार्य झाले आपल्या हातून झाले पाहिजे असे सांगितले.

काशीदवाडीचे सरपंच महादेव जाधव यांनी वक्रतुंड गणेश मंडळ यांनी अतिशय चांगला उपक्रम राबवला असून लवकरच हे झाडे जोपासण्याचे काम झाल्यावर नैसर्गिक समतोल राखला जाईल आणि यासाठी आमचे गाव निवडल्या बद्दल वक्रतुंड गणेश मंडळाचे आभार मानले यावेळी प्रशांत नगर भागातील वक्रतुंड गणेश मंडळाचे सर्व युवा वर्ग उपस्थित होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!