कृषीसामाजिक

केज तालुक्यातील शेतकरी बांधवांनी ई के वाय सी करुन घ्यावी यासाठी सीएससी केंद्र व ग्रामपंचायत स्तरावर सुविधा उपलब्ध – तहसीलदार राकेश गिड्डे 

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यात अद्याप इ केवायसी न केल्याने अनुदान प्राप्त झाले नाही अशा शेतकऱ्यांची एकूण संख्या 8548 इतकी आहे तसेच सदर शेतकऱ्यांचे एकूण 9.13 कोटी इतके अनुदान वाटप प्रलंबित आहे.त्यामुळे सर्व संबंधित प्रलंबित शेतकरी यांची इ केवायसी करून घेण्या साठी कॅम्प सर्व सीएससी केंद्रावर आणि ग्राम पंचायत स्तरावर आज पासून आयोजित केला आहे.

इ केवायसी पोर्टल हे सकाळी आणि सायंकाळी व्यवस्थित चालत असल्याने कृपया सकाळी लवकर आणि संध्याकाळी इ केवायसी करून घेण्यास सर्व शेतकऱ्यांना कळवावे. प्रलंबित इ केवायसी शेतकरी यांची यादी वाॕटस अप ग्रुपवर गाव निहाय शेअर करणार असल्याचे तहसीलदार राजेश गिड्डे यांनी सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!