सांस्कृतीक

रोटरी क्लब गेवराई यांच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त स्पर्धांचे आयोजन नोंदणी आवश्यक प्रा.राजेंद्र बरकसे यांची माहिती 

गेवराई/प्रतिनिधी

सामाजिक दृष्टिकोन ठेवून समाजकार्य करणाऱ्या रोटरी क्लब ऑफ गेवराई च्या वतीने गणेशोत्सव २०२५ मध्ये उत्कृष्ट देखावा व विविध सामाजिक प्रबोधनात्मक उपक्रम राबविणाऱ्या गणेश मंडळांसाठी पारितोषिक योजना जाहीर करण्यात आली आहे स्पर्धेसाठी नियम व अटी खालीलप्रमाणे राहतील.

१) स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक गणेश मंडळांनी न्यास नोंदणी कार्यालय अथवा पोलिस स्टेशन येथून नोंदणी परवाना प्राप्त करणे आवश्यक

२) ही स्पर्धा फक्त गेवराई शहर स्तरावरच आहे.

३) ११ दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवात श्री गणेशमूर्ती स्थापना ते विसर्जन कालावधीत डीजेचा वापर टाळून कमी आवाजात साऊंड सिस्टीम वापरावी.

४) गुलालाऐवजी फुलांची उधळण करण्यास प्राधान्य द्यावे,तहसील प्रशासनाने ठरवून दिलेल्या विहिरीत श्रींच्या मूर्तीचे विसर्जन करावे.गणेश मूर्तीसमोर जुगार नसावा व गाणी धार्मिकच असावी.

५) गणेश मंडळाने शिस्त व शांतता राखणे ६) राष्ट्रीय एकात्मता, पर्यावरण संतुलन, देशभक्ती,स्त्री सबली करण,बालमजुरी उच्चाटन,अंधश्रद्धा निर्मूलन,वृक्षारोपण, अन्नदान,रक्तदान, शेतकऱ्यांच्या समस्या व उपाय ,शेतकरी व तरुणांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी प्रयत्न, बेरोजगारी,महागाई, भाईचारा,स्वदेशी प्रचार आदीविषयांवर देखावा, उपक्रम,कार्यक्रम गणेश मंडळाने सादर करणे आवश्यक आहे.

७) केलेल्या कार्यक्रमाचे व्हिडीओ शूटींग, फोटोग्राफ,वृत्तपत्रांची कात्रणे पुरावा म्हणून रोटरी क्लब ऑफ गेवराई यांच्या कडे दि.८ सप्टेंबर पर्यंत व्हॉटसॲपद्वारे सादर करावे लागतील.

८) संयोजक कोणत्याही क्षणी आपापल्या पद्धतीने गणेश मंडळांना भेटी देऊन उपक्रमांची तपासणी करतील.

९) परिक्षकांचा निर्णय अंतिम व बंधनकारक राहील .

१०) प्रथम द्वितीय व तृतीय आणि दोन उत्तेजनार्थ अशी ५ पारितोषिके देण्यात येणार आहेत . आकर्षक दोन फुटी ट्रॉफी,प्रमाणपत्र,शाल ,श्रीफळ देऊन पारितोषिके देण्यात येणार आहेत.स्पर्धेचा निकाल वृत्तपत्रांतून जाहीर केला जाईल. एका शानदारसोहळ्यात पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे. त्याची पूर्वसूचना विजेत्यांना देण्यात येईल.

११ ) अधिक माहितीसाठी रोटरी क्लब ऑफ गेवराईचे अध्यक्ष प्रा.राजेंद्र बरकसे मो.नं. (9422744266)व सचिव प्रविण जैन (9422745824), प्रोजेक्ट चेअरमन उत्तमराव सोलाने (9420310111 ) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन रोटरी क्लब ऑफ गेवराईचे संचालक मंडळ व प्रोजेक्ट सर्व्हिस समिती सदस्य डॉ.अभिनव मुळे,राजेंद्र डेंगे,मनोज टाक, रामदास शिंदे,नितीन सुरवसे,प्रा.मुंढे रामप्रभू प्रा.प्रदिप मुक्कावार यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!