धारुरच्या जनता दरबारात जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या कडे उपसरपंच तुषार खुळे यांनी मांडली कोळ पिंपरी रस्त्याची कैफियत

केज/प्रतिनिधी
कोळ पिंपरी ता.धारूर जि.बीड येथील कोळ पिंपरी बस स्टँड राष्ट्रीय महामार्ग २३२ ते कोळ पिंपरी गाव हा १.२किमी असुन मागील अनेक वर्षांपासून तो नादुरुस्त व अनेक खाच खळगे असलेला झाला आहे. याच रस्त्यावर जिल्हा परिषद शाळा,माध्यमिक विद्यालय असल्याने विद्यार्थ्यांना दररोजच्या त्रासाला सामोरे जावे लागते.
तसेच गर्भवती महिला व रुग्णाला धारुर ला नेण्यासाठी हा रस्ता असुन अडचण नसुन खोळंबा झाला आहे.या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी उपसरपंच तुषार विजयकुमार खुळे यांनी कार्यकारी अभियंता, बांधकाम विभागास तीन महिन्यांपूर्वी निवेदन दिले होते.आज धारुर येथील जनता दरबारात ही जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनाही निवेदन दिले.या रस्त्यासाठी लवकरच योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन या वेळी उपसरपंच तुषार खुळे यांना जिल्हाधिकारी यांनी दिले आहे.



