प्राथमिक निवासी आश्रम शाळा,टाकळी येथे लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे साहेब यांची जयंती साजरी

केज/प्रतिनिधी
प्राथमिक निवासी आश्रम शाळा,टाकळीयेथे दिनांक १२ डिसेंबर २०२५ रोजी लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.कार्यक्रमाची सुरुवात मुंडे साहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहून झाली. हा मान संस्थेच्या सचिव श्रीमती.
काशिबाई नारायणराव घुले यांच्या हस्ते पार पडला.त्यानंतर मुंडे साहेबांच्या कार्याची, विचारांची आणि लोकसेवे तील योगदानाचीउजळणी विविध मनोगतांच्या माध्यमातून करण्यात आली.कु.साक्षी घुले,चि. ओमकार मुंडे,चि.तेजस आंधळे,चि.प्रविण चौरे या विद्यार्थ्यांनी प्रभावी आणि हृदयस्पर्शी मनोगते सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.विद्यार्थ्यांच्या मनोगतांमध्ये मुंडेसाहेबांचे साधेपण,जनसेवा आणि नेतृत्वगुण यांचा विशेष उल्लेख करण्यात आला.
कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष श्री.शंकर घुले, शाळेचे मुख्याध्यापक श्री. घुले ए.एन.सर,तसेच श्री. श्रीकांत घुले सर यांच्या सह शाळेतील सर्व शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी मुंडे साहेबांच्या प्रेरणादायी कार्याचा आढावा घेत विद्यार्थ्यांना त्यांच्या आदर्शातून मार्गदर्शन करण्याचा संदेश दिला.


