
केज / प्रतिनिधी
केज येथील उपजिल्हा रुग्णालयात कृष्णा डायग्नोस्टिक लि. सिटीस्कॅन सेवा देणाऱ्या या खाजगी कंपनीस रुग्णांना उत्कृष्ट सेवा दिल्याबद्दल नवी दिल्ली एन ए बी एच यांच्याकडून सन्मानपत्र प्राप्त झाले. उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्तात्रय केंद्रे ,स्त्री रोग तज्ञ डॉ.इंगोले,डॉ.हनुमंत सौदागर यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
व्यवस्थापक विवेकानंद स्वामी,तंत्रज्ञ अशोक दहिफळे, बाजीराव चाटे, अभिजित थोरात,सिद्धार्थ मुंडे,ज्ञानदेव मुंडे,सुषमा सोनवणे यांनी दिलेल्या सेवेबद्दल हे सन्मानपत्र प्राप्त झाले आहे.ग्रामीण भागातील रुग्णांनाचांगली आरोग्य सेवा दिल्याबद्दल हे सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. यापुढील कालावधी मध्येही २४ तास सेवा उपलब्ध राहील अशी माहिती कंपनीचे प्रमुख स्वामी विवेकानंद यांनी दिली.



