कृषी
शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी अजितदादा पवार यांना रमेशराव आडसकर यांनी दिले निवेदन

मुंबई/प्रतिनिधी
मागील काही दिवसांत बीड जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतांना तळ्याचे स्वरूप आले होते.यामुळे सर्व पिके वाहुन गेले आहेत. त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत.
केज तालुक्यात शेतांना अतिवृष्टीचा अधिक फटका बसला आहे. रमेशराव आडसकर यांनी स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करून शासन दरबारी आपण भेटून शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले होते.
काल राज्याचे उप मुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेऊन सर्व परिस्थितीची माहिती देऊन शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी अशा मागणीचे निवेदन दिले आहे.शेतकऱ्यांना लवकरच आर्थिक मदत दिली जाईल असे आश्वासन अजितदादा पवार यांनी यावेळी दिले आहे.यामुळे सर्व शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.



