शारदा इंग्लिश स्कूलच्या विरोधात पालक 15 ऑगस्ट रोजी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करणार आमरण उपोषण.

केज/प्रतिनिधी
केज शहरात नावाजलेले सुप्रसिद्ध म्हणून शारदा इंग्लिश स्कूलची ओळख आहे. या इंग्लिश स्कूलने चि. प्रतीक महादेव कराड या विद्यार्थ्याचे पुढील एॕडमिशन साठी टीसी व मार्कमेमो दिला नाही यामुळे विद्यार्थ्यांचे पालक महादेव सोपान कराड हे दि.15 ऑगस्ट रोजी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहेत.याबाबत सविस्तर वृत्त असे की, चि.प्रतीक महादेव कराड राहणार तांबवा तालुका केज जिल्हा बीड येथील रहिवासी असून या मुलाचे शिक्षण पहिली ते दहावी शारदा इंग्लिश स्कूल केज या ठिकाणी झाले आहे.दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर त्याचा नंबर स्व.प्रमोद महाजन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बनकरंजा येथे लागला होता परंतु, शारदा इंग्लिश स्कूल ने या विद्यार्थ्यांचा टीसी व मार्क मेमो न दिल्यामुळे शासनाने दिलेल्या दि. 08 आॕगष्ट 2025 या तारखेत प्रवेश झाला नाही.
त्यानंतर दिनांक 11 आॕगष्ट 2025 रोजी पर्यंत शासनाकडून ऍडमिशन साठी तारीख वाढविण्यात आलेली आहे.परंतु शारदा इंग्लिश स्कूलने चि. प्रतीक महादेव कराड या विद्यार्थ्यांचा अध्याप पर्यंत टीसी व मार्क मेमो दिलेला नाही यामुळे पालकावर आमरण उपोषणाची वेळ आलेली आहे.आपल्या पाल्याचा टीसी व मार्क मेमो मिळावा यासाठी महादेव सोपान कराड हे दि.15 ऑगस्ट रोजी बीड जिल्हाधिकारी कार्यालय येथे आमरण उपोषणास बसणार आहेत.



