सामाजिक

विश्व हिंदू परिषद स्थापना दिन व जीवन गौरव पुरस्कार वितरण समारंभ

अंबाजोगाई/प्रतिनिधी

विश्व हिंदु परिषद, अंबाजोगाई प्रखंड व बजरंग दल अंबाजोगाई च्यावतीने धर्मवीर विश्व हिंदू परिषद स्थापना दिन व जीवनगौरव पुरस्कार वितरण समारंभ रविवार दि.१७ ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता गोपीनाथराव मुंडे सभागृह,खोलेश्वर महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आली असून आपल्या प्राणांची पर्वा न करता केलेल्या अतुलनीय हिंदूधर्म रक्षण व कार्याबद्दल प्रफुल्ल (नाना) कुलकर्णी यांना धर्मवीर जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.डॉ. शरदराव हेबाळकर (पूर्व अध्यक्ष,अखिल भारतीय इतिहास संकलन समिती,रा.स्व. संघ) हे राहणार आहेत.

तर प्रमुख पाहुणे आ.नमिता मुंदडा, कृष्णाजी देशमुख (विहिंप.प्रान्त कार्य. सदस्य,बजरंगदल प्रान्त पालक)चंद्रकांत घोलप (संयोजक बजरंग दल प्रांत)अॕड.बाळकृष्ण तेरकर(जिल्हा मंत्री विहिंप)डॉ.मुकुंद कुलकर्णी (प्रांत सेवा प्रमुख,विहिंप) डॉ.गोपाळ चौसाळकर (जिल्हा उपाध्यक्ष विहिंप),साईनाथ उपरे (अध्यक्ष,निलेश डहाळे मंत्री)आदी उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन

अशिष शिंदे,अक्षय सातपुते,संयोजक सुदर्शन महाराज साखरे संघटक मिलिंद जोगी विश्व हिंदु परिषद व बजरंग दल प्रखंड, अंबाजोगाई यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!