सामाजिक

नेताजी सुभाषचंद्र बोस ऑक्सिजन पार्कची निर्मिती 

अंबाजोगाई/प्रतिनिधी

स्वा.रा.ती.महाविद्यालयात राष्ट्रीय छात्रसेनेने माय अर्थ माय ड्युटी अभियानांतर्गत १०१ वृक्ष लावून नेताजी सुभाषचंद्र बोस स्मृती ऑक्सिजन पार्कची निर्मिती केली आहे. यावेळी मेजर एस.पी. कुलकर्णी,छात्रसेना अधिकारी पाराजी शिंपले,सोनटक्के,प्रा. प्रवीण भोसले,सागर कुलकर्णी,ज्ञानेश्वर सोनवणे,भाऊराव मुंडे आदी उपस्थित होते.

छात्रसैनिकांनी श्रमदानाने स्वच्छता केली.त्या ठिकाणी वृक्षारोपणासाठी खड्डे खोदले तिथे चिंचबनची निर्मिती केले.या ठिकाणी ऑक्सिजनचा साठा होत आहे.या वृक्षाखाली विद्यार्थ्यांनी अभ्यास करून नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या सारखे मोठे देशभक्त व्हावे.श्रमदानाचे महत्त्व कळावे यासाठी १०१ वृक्ष लावून ऑक्सिजन पार्क तयार केला आहे. वृक्ष लागवडी बरोबरच त्यांच्या संगोपनाचाही निर्धार विद्यार्थ्यांनी केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!