वैद्यकीयसामाजिक

जागतिक एड्स पंधरवाडा निमित्त एचआयव्ही जन जागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न,आयसीटी विभागा च्या वतीने केशरबाई नर्सिंग कॉलेज येथे एचआयव्ही एड्स जनजागृती 

केज/प्रतिनिधी

जागतिक एड्स पंधरवाडा निमित्त दि.११ डिसेंबर रोजी जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष, जिल्हा रुग्णालय बीड यांच्या मार्गदर्शनानुसार तसेच उपजिल्हारुग्णालय केजचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.दत्तात्रय केंद्रे सरयांच्या नेतृत्वाखाली आयसीटी विभागाच्या वतीने केशरबाई नर्सिंग कॉलेज येथे एचआयव्ही एड्स जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक सुहास कुलकर्णी सर होते. प्रयोगशाळातंत्रज्ञ फारोकी मॅडम,वन स्टॉप सेंटरच्या खांडेकर मॅडम तसेच ॲड.पंडित सर व शेप मॅडम यांची उपस्थिती कार्यक्रमाचे औचित्य वाढवणारी ठरली. खांडेकर यांनी सखी सेंटरची सविस्तर माहिती उपस्थित विद्यार्थ्यांना दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समुपदेशक शोभा साकसमुद्रे यांनी केले.

त्यानंतर सुहास कुलकर्णी सरांनी एचआयव्ही एड्स, एसटीआय,आरटीआय आजारांबाबत सखोल मार्गदर्शन करून आयईसी साहित्याचे वाटप केले. यावर्षीचे घोषवाक्य अडथळ्यावर मात करू, एकजुटीने एचआयव्ही एड्सला लढा देऊ,नव परिवर्तन घडवू याबाबतही महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली.तसेच एचआयव्ही एड्स कायदा २०१७ आणि हेल्पलाईन क्रमांक १०९७ याबद्दल जनजागृती करण्यात आली.

कार्यक्रमा निमित्त पोस्टर प्रदर्शन व रंगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून सहभागी विद्यार्थ्यांचे क्रमांक जाहीर करण्यात आले.या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थाचालक चाटे सर व चाटे मॅडम यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.तसेच कॉलेजचे प्राचार्य रमा सरोदे आणि प्राध्यापक वृंद यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभल्याने कार्यक्रम अत्यंत यशस्वीपणे पार पडला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!