समता सैनिकदलाचे भव्य प्रशिक्षण शिबिर आंबेडकरी तरुणाईच्या संघटनशक्तीला नवी दिशा संविधानाच्या सन्माना साठी,समतेच्या विचारां साठी 14 डिसेंबरला केजमध्ये एकत्र येणार समता सैनिक दलाचे अनुयायी

केज/प्रतिनिधी
समता,स्वातंत्र्य,न्याय आणि बंधुता या मूल्यांची जपणूक करणाऱ्या बदलाच्या सैनिकांची नवीन पिढी घडविण्या साठी भारतीय बौद्ध महासभा,शहर शाखा केज तर्फे समता सैनिक प्रशिक्षण शिबिराची तयारी वेगात सुरु झाली आहे.रविवार दि.14 डिसेंबर 2025 रोजी आयोजित या भव्य शिबिरासाठी शहरातील तसेच परिसरातील बौद्ध अनुयायांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
“संविधान के सन्मान में, समता सैनिक दल मैदान में” सह सुरु झालेल्या या अभियानाचा उद्देश तरुणाईत संविधानिक मूल्यांची जाणीव,शिस्त, संघटन कौशल्य आणि सामाजिक चळवळीचे भान दृढ करणे हा आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या समता सैनिक दलाचे कार्य फक्त संघटनापुरते मर्यादित नसून, सामाजिक समानता आणि बंधुभावावर आधारित प्रबुद्ध भारत घडविण्याचा त्यामागचा मूलाधार आहे.या शिबिरात तरुणांना संविधानिक तत्त्वांची ओळख,नेतृत्व कौशल्य, सामाजिक प्रश्नांची जाण आणि शिस्तबद्ध संघटन कार्याची प्रत्यक्ष शिकवण दिली जाणार आहे.
आयोजकांच्या मते,१८ वर्षांवरील सर्व युवक युवतींनी समता सैनिक दलाच्या सदस्यत्वासह या शिबिरात सहभागी होऊन परिवर्तन यात्रेचा भाग व्हावे.शिबिराच्या आयोजनासाठी शहर शाखेकडून मोठे संपर्क पथक जाहीर करण्यात आले आहे. त्यामध्ये आयु. जयपाल मस्के शहराध्यक्ष (मो.8983149949) , आयु.शिवकुमार मस्के शहर सरचिटणीस (मो. 9423170591),आयु. चंद्रकांत मस्के (नाना) कोषाध्यक्ष (मो. 7559243633),आयु. महेंद्र मस्के संस्कार उपाध्यक्ष (मो. 9970663037),डॉ. प्रभाकर ठोके माजी शहराध्यक्ष,आयु. नंदकुमार मस्के माजी तालुकाध्यक्ष तसेच प्रा. धनराज भालेराव,प्रा.डॉ. बी.जे.हिरवे,अजय गालफाडे,अक्षय हजारे, प्रमोद मस्के आदींसह एक मोठा स्वयंसेवक वर्ग कार्यरत आहे.ही सर्व नावे आयोजक मंडळातील सक्रिय पदाधिकारी असल्याने नोंदणी व माहिती देण्यासाठी संपूर्ण शहरभर कार्यरत राहणार आहेत.
सध्याच्या सामाजिक,सांस्कृतिक आणि संविधानिक वातावरणात आंबेडकरी विचारांचे संरक्षण आणि प्रसार करण्यासाठी सुसंघटित व सजग तरुणाईची आवश्यकता प्रकर्षाने जाणवते.या पार्श्वभूमीवर केज मधील हे शिबिर केवळ एक कार्यक्रम नसून “समता, न्याय आणि बंधुतेच्या समाजरचनेची नवी सुरुवात” म्हणून पाहिले जात आहे.या कार्यक्रमाचे ठिकाण नालंदा विद्यालय, फुलेनगर,केज येथे रविवार दि.14 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजल्या पासून सुरुवात होणार आहे.



