सामाजिक

ईदच्या पावन पर्वानिमित्त केजमध्ये बंधुभावाचा संदेश,शेर-ऐ-हिंद हजरत टिपू जयंती उत्सव कमिटी कडून नागरिकांना हार्दिक शुभेच्छा

केज/प्रतिनिधी

पवित्र रमजान महिन्या नंतर साजरा होणाऱ्या ईद-उल-फित्र या आनंद दायी सणानिमित्त केज शहरात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. या मंगलमय प्रसंगी शेर-ऐ-हिंद हजरत टिपू जयंती उत्सव कमिटी, केज यांच्या वतीने सर्व मुस्लिम बांधवांसह सर्व धर्मीय नागरिकांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.कमिटीचे प्रमुख सदस्य ईरफान पठाण,अमन पठाण, नासेर तांबोळी,साहिल तांबोळी,इम्रान सय्यद, वाहेद तांबोळी यांनी एकत्र येत “ईद हा केवळ एक धार्मिक सण नसून, तो प्रेम,बंधुभाव आणि एकतेचा संदेश देणारा सण आहे,”असे सांगत समाजात शांतता आणि सौहार्द टिकवण्याचे आवाहन केले आहे.

ईदच्या दिवशी मुस्लिम बांधव मशिदीत जाऊन विशेष नमाज अदा करतात,तसेच एकमेकांना आलिंगन देत ‘ईद मुबारक’च्या शुभेच्छा देतात.गरीब आणि गरजू लोकांना जकात आणि फित्रा देऊन समाजातील समानतेचा संदेश दिला जातो.या सर्व परंपरांमुळे ईद हा सण समाजातील बंधुभाव अधिक दृढ करणारा ठरतो. कमिटीच्या वतीने देण्यात आलेल्या संदेशात नमूद करण्यात आले आहे की, “आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनात अशा सणांच्या माध्यमातून माणसा माणसांतील नाते अधिक घट्ट करण्याची गरज आहे.सर्वांनी मिळून प्रेम, सहकार्य आणि एकतेने राहावे,हीच खरी ईदची शिकवण आहे.”

केज शहरातील विविध भागांमध्ये ईद निमित्त सजावट करण्यात आली असून,बाजारपेठा गजबजलेल्या दिसत आहेत.नवीन कपडे,गोड पदार्थ आणि एकमेकांना भेटवस्तू देण्याचा आनंद नागरिक घेत आहेत. लहान मुलांमध्ये विशेष उत्साह असून,त्यांनी या सणाचा आनंद मोठ्या जल्लोषात साजरा केला.

शेवटी,शेर-ऐ-हिंद हजरत टिपू जयंती उत्सव कमिटी,केज यांनी सर्वांना सुख,समृद्धी आणि आरोग्यदायी जीवनाच्या शुभेच्छा देत, “आपल्या सर्वांच्या आयुष्यात आनंद,शांती आणि यश लाभो,”अशी प्रार्थना केली आहे.

ईद मुबारक!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!