सामाजिक

गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर ‘स्वरांजली संगीत विद्यालय’चे जल्लोषात उद्घाटन

केज/प्रतिनिधी

केज शहरात गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर दि.१९ रोजी ‘स्वरांजली संगीत विद्यालय’चा उद्घाटन सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण आणि दिमाखदार वातावरणात पार पडला. सांस्कृतिक जाणीवा जपणाऱ्या या नव्या उपक्रमामुळे केज परिसरात संगीत शिक्षणाला नवे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.या सोहळ्याच्या अध्यक्ष स्थानी केज नगरपंचायती च्या नगराध्यक्षा डॉ.सौ. सीताताई बनसोड या होत्या.त्यांच्या हस्ते विधिवत रिबीन कापून विद्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हारुणभाई इनामदार यांचीउपस्थिती कार्यक्रमाला लाभली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस च्या महिला तालुका अध्यक्षा सौ.शितलताई लांडगे,जिजाऊ ब्रिगेड च्या जिल्हाध्यक्षा सौ. राधाताई सपकाळ,ज्येष्ठ पत्रकार व समाजसेवक प्रा.हनुमंत भोसले,महा वितरणचे विज सहाय्यक विष्णू तेलंग तसेच पोलिस उप निरीक्षक लांडगे साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या उपस्थिती मुळे कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली.

कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते तसेच पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.ज्येष्ठ पत्रकार धनंजय कुलकर्णी,दैनिक पार्श्वभूमीचे अभय जोशी, रंजीत घाडगे,विजय बिक्कड,अशोकसोनवणे, प्रदीप गायकवाड, पांडुरंग कसबे,अनिल ठोंबरे,संजीवन कोरडे यांच्यासह अनेक पत्रकारांनी या सोहळ्याला उपस्थित राहून कार्यक्रमाला गौरव प्राप्त करून दिला.

याशिवाय कला-क्रीडा विश्व समितीचे पदाधिकारी व सदस्य, तसेच परिसरातील नागरिकांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.स्थानिक नागरिकांची उपस्थिती या उपक्रमाबद्दल असलेली उत्सुकता आणि प्रेम दर्शवत होती.

कार्यक्रमाची सुरुवात प्रास्ताविकाने झाली.प्रा. रमेश सरवदे यांनीप्रभावी शब्दांत कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करत ‘स्वरांजली संगीत विद्यालय’च्या स्थापने मागील उद्देश स्पष्ट केला. त्यांनी संगीत शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत, विद्यार्थ्यांना कला क्षेत्रात प्रोत्साहन देण्याची गरज व्यक्त केली.यावेळी स्वरमंडल संगीत विद्यालयाचे सर्वेसर्वा प्रा. राजकुमार ठोके सर यांचीही विशेष उपस्थिती होती.त्यांनीही या उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांनी संगीत क्षेत्रात करिअर घडवावे,असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमात प्रा.रमेश सरवदे यांनी आपल्या सुरेल आवाजातून उपस्थित मान्यवर आणि प्रेक्षकांची मने जिंकली. त्यांच्या सादरीकरणामुळे कार्यक्रमात सांगीतिक रंग भरला आणि वातावरण भारावून गेले.

एकूणच, स्वरांजली संगीत विद्यालयाच्या उद्घाटन सोहळ्याने केज शहरात सांस्कृतिक वातावरण निर्माण केले असून,या विद्यालयाच्या माध्यमातून अनेक नवोदित कलाकार घडतील,अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!