मायबाप सरकारने युवा प्रशिक्षणार्थीना कायम स्वरूपी हक्काची भाकरी द्यावी – दत्तात्रय मुजमुले,सांगली येथील बेमुदत आमरणउपोषण म्हणजे उद्रेकाची सुरूवातच

केज/प्रतिनिधी
महाराष्ट्रातील महायुती सरकारने राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी निवडणुकीच्या तोंडावर सहा महिन्यांसाठी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी म्हणून योजना काढली.त्यात अनेक तरुणांना अल्प रोजगार मिळाला.मात्र सरकारने त्यापुढे फक्त पाच महिन्याचा कालावधी वाढवत सुशिक्षित बेरोजगार तरुण तरुणींचे भविष्य अंधारात ढकलले आहे.
सरकारने राज्यातील अंदाजे 1 लाख ३४ हजार मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थीनावाऱ्यावर सोडत आहेत.बेरोजगार तरुणांच्या हाताला काम नाही,त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.पुढे पाच महिने वाढीव देण्यात आले असून भविष्यात मात्र कालावधी वाढवणार नसल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले आहे.राज्या तील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व त्या खात्याचे मंत्री हे युवा प्रशिक्षणार्थीच्या भावनेशी खेळत आहेत.प्रशिक्षणार्थीना हे सरकार फसवत आहेत.युवाप्रशिक्षणार्थीयांना हक्काची कायम स्वरूपी भाकरी मिळवून देण्यासाठी सांगली जिल्ह्यातील कृष्णामाईच्या घाटावर महाराष्ट्र राज्य युवा प्रशिक्षणार्थी कृती समितीचे तुकाराम बाबा महाराज हे पाच दिवस आमरण उपोषणाला बसले होते.ही युवा प्रशिक्षणार्थीच्या उद्रेकाची सुरूवात आहे.तरी सरकारने राज्यातील युवा प्रशिक्षणार्थी यांच्या मागण्या गांभीर्याने घेऊन राज्यातील युवा प्रशिक्षणार्थीना कायम स्वरूपी हक्काची भाकरी द्यावी अशी मागणी युवा प्रशिक्षणार्थी तथा पत्रकार दत्तात्रय मुजमुले यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली आहे.



