सामाजिक

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित दादा पवार यांचा पत्रकारांच्या वतीने आज स्वागत समारंभ 

बीड/प्रतिनिधी

बीड जिल्ह्याच्या विकास कामांमध्ये महत्वपुर्ण योगदान देत असल्याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड चे पालकमंत्री अजित दादा पवार यांचा आज गुरुवार दिनांक दि.7 ऑगस्ट 2025 रोजी बीड जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला आहे.

महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री ना.अजित दादा पवार यांनी बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी स्विकारल्या पासून अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत.दि.2 एप्रिल 2025 रोजी अजित दादांनी बीडमध्ये “Center for Invention,Innovation, Incubation and Training (CIIIT)’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला.तत्पूर्वीच टाटा टेक्नॉलॉजीने 191 कोटींच्या गुंतवणुकीतून दोन आठवड्यातच हा प्रकल्प सुरू करण्याची संकल्पना मांडली असून,त्यात दरवर्षी सुमारे 7 हजार युवकांना प्रशिक्षित करण्याची क्षमता ठेवण्यात आली आहे. बीड एमआयडीसी औद्योगिक परिसरातील 4,000 चौरस मीटर जागेची व्यवस्था आणि प्रकल्प उभारणीसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे.बीड जिल्ह्यामध्ये पूर्वी मोठ्या प्रमाणात देण्यात आलेल्या 340 शस्त्र परवान्यांची फेर तपासणी करुन ते रद्द करण्याचे आदेश अजित दादांनी दिले. त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसला. बीड जिल्ह्याचे पोलीस दल सक्षम व्हावे यासाठी 16 कोटी रुपये  विशेष निधी मंजूर करण्यात आला.परळी येथे पशुवैद्यकिय महाविद्यालयाला 500 कोटी रुपयांची तरतुद अजित दादांनी केली.

दिनांक 17 मार्च 2025 रोजी अजित दादा पवार यांनीविधानसभेत एका प्रश्‍नाच्या उत्तरात बीडमध्ये सुसज्ज विमानतळ उभारण्याची घोषणा केली.या विमानतळासाठी लागणार्‍या जमिनीचे अधिग्रहण करण्याचे आदेश दिले.बीड जिल्हा प्रशासन या कामामध्ये अत्यंत गतीने काम करताना दिसत आहे.या शिवाय इतरही अनेक निर्णय ना.अजीत दादा पवार यांनी घेतले असून बीड जिल्हा प्रशासनाची प्रतिमा स्वच्छ आणि पारदर्शक करण्यामध्ये त्यांचा मोठा सहभाग आहे.एकूणच या सर्व कामाची दखल घेवून ना.पवार यांचे ऋणनिर्देश व्हावेत यासाठी पत्रकार संघाने पुढाकार घेतला आहे. आज गुरुवार दि.7 ऑगस्ट रोजी बीड शहरातील नगर रोड वरील तहसील ऑफिस च्या समोर असलेल्या हॉटेल निलकमलच्या सभागृहात सायंकाळी 4 वाजता ना.अजित दादा पवार यांचा स्वागत समारंभ संपन्न होत आहे.या कार्यक्रमाला बीड जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे,पत्रकार संघाचे बीड जिल्हाध्यक्ष संतोष मानूरकर,तसेच वैभव स्वामी,बालाजी तोंडे,शेख रिजवान, प्रतिक कांबळे,अमजद पठाण,दिपककाळकुटे, अ‍ॅड.विनायक जाधव, शेख आएशा,शेख ताहेर आदिंनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!