भारतीय नमो संघाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त एक शाम मोदीजी के नाम कार्यक्रमात बीड जिल्ह्याचा सन्मान

केज/प्रतिनिधी
भारतीय नमो संघाच्या वतीने दिल्ली येथील एन डी एम सी कन्वेक्शन सेंटर,संसद मार्ग नवी दिल्ली येथे एक शाम मोदीजी के नाम कार्यक्रमात बीड जिल्ह्यातील दोघांचा सन्मान करण्यात आला या बाबत सविस्तर माहिती अशी की,दि. 17 सप्टेंबर रोजी भारताचे यशस्वी पंतप्रधान आदरनीय नरेंद्रभाई मोदीजी यांचा वाढदिवस देश विदेशा तील विविध ठिकाणी वेगवेगळया स्वरुपात साजरा केला जातो. यामध्ये सामाजिक उपक्रम,रॕली,अन्नदान, धार्मिक कार्यक्रम, देशभक्तीपर कार्यक्रम अशा प्रकारची जन हिताची कामे केली जातात.याचाच एक भाग म्हणून एन डी एम सी कनव्हेक्शन सेंटर, संसद मार्ग,नवी दिल्ली येथे एक शाम मोदीजी के नाम हा देशभक्तीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाला विशेष आमंत्रण भारतीय नमो संघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री. भाऊसाहेब घोडके, हेमंत कालीया राष्ट्रीय मंत्री मुंबई,व भारतीय नमो संघाचे केज तालुकाध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केजचे तालुकाध्यक्ष पत्रकार श्री.चंद्रकांत पाटील यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना आमंत्रित करण्यात आले होते.या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती नमो संघाचे राष्ट्रीय रक्षक श्री.नरेशजी बन्सल संसद सदस्य राज्यसभा राष्ट्रीय कोषाध्यक्ष भारतीय जनता पार्टी, भाजपा पुर्व सांसद अनिताजी आर्या, वरीष्ठ,नमो संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मन्नुजी तोमर,नमो संघ राष्ट्रीय संघटन मंत्री हेमंत शर्मा, राजनितीज्ञ तथा आर एस एस नेता यांच्यासह विवीध मान्यवर उपस्थित होते.
भारतीय नमो संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मन्नुसिंहजी तोमर यांच्या संकल्पने तून हाकार्यक्रम घेण्यात आला.मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.यानंतर देश भक्तीपर गितांचा कार्यक्रम शालेय विद्यार्थ्यांचा संपन्न झाला.यावेळी देशभक्ती मुळे भावनिक वातावरण तयार झाले होते.यानंतर स्वदेशी वस्तुंचीच खरेदी करण्यासाठी सर्वांनी शपथ घेतली.मा.खा. नरेशजी बन्सल यांनी भारतीय नमो संघाच्या कार्याची प्रशंसा करून सदैव नमो संघाच्या पाठिशी असल्याची ग्वाही दिली तसेच पंतप्रधान नरेंद्र भाई मोदीजी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.मान्यवरांच्या भाषणानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रम संपन्न झाला.



